Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: निवडणुकीआधी लाडक्या बहि‍णींना खुशखबर मिळणार, नोव्हेंबरचे ₹१५०० या दिवशी जमा होण्याची शक्यता

Ladki Bahin Yojana November Installment: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता निवडणूकीपूर्वी दिला जाऊ शकतो.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार?

या दिवशी महिलांना मिळू शकतात पैसे

लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी मुदतवाढ देऊन महिलांना दिलासा दिला आहे. दरम्यान, त्यानंतर आता अजून एक प्रश्न महिला विचारला जात आहे. लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न महिलांना पडलेला आहे. याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.

लाडकीला नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार? (Ladki Bahin Yojana When Will November Installment Come)

नोव्हेंबर महिना सुरु होऊन १८ दिवस झाले आहेत. अजूनपर्यंत नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. लवकरच हे पैसे जमा केले जातील. याचसोबत सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहे. यात आचारसंहितेच्या काळात महिलांच्या खात्यात पैसे येणार की नाही असा प्रश्न विचारला जात आहे. परंतु या काळातही पैसे जमा होणार असल्याचे सांगितले आहे.

निवडणुकीआधीच लाडक्या बहि‍णींना मिळणार पैसे

लाडकी बहीण योजनेत निवडणुकीआधीच महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका २ आणि ३ डिसेंबरला आहेत. त्याआधी महिलांना १५०० रुपये देण्याबाबत घोषणा होऊ शकते. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात महिलांना पैसे देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी हे काम करा (Maharastra Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana KYC Link)

लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे गरजेचे आहे. जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाहीये. यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर केवायसी करावी. याचसोबत केवायसी करताना वेबसाइटवर येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी काही बदल केले आहेत. यामुळे महिलांना कोणत्याही अडचणीशिवाय केवायसी करता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Walking Fitness Routine: खरचं १०,००० पाऊलं चालण्याने शरीरात हे चमत्कारीक बदल होतात का?

Guru Gochar 2026: 12 वर्षांनंतर गुरु करणार सूर्याच्या राशीत प्रवेश; या राशींना मिळणार चांगली नोकरी आणि पैसा

Green Chutney Recipe : 'सँडविच'ची चव वाढवणारी 'हिरवी चटणी' घरी कशी बनवाल? वाचा परफेक्ट रेसिपी

Earthquake: अमरावती पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं; ३ महिन्यात चौथ्यांदा जाणवले भूकंपाचे धक्के

नव्या लोखंडी कढईचा चिकटपणा काही केल्या जात नाही? या सोप्या टीप्स वापरून पाहा

SCROLL FOR NEXT