Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो केवायसी करा, नाहीतर... अजित पवारांची वॉर्निंग; Video

Ajit Pawar : ई-केवायसीनं लाडकीची डोकेदुखी आणखी वाढलीय... गावोगावी याचं ई-केवायसीच्या प्रक्रियेसाठी लाडकीला कशी कसरत करावी लागतेय? उपमुख्यमंत्र्यांनी नेमके काय आदेश दिलेत?
Ajit Pawar on Ladki Bahin Yojana Ekyc
Ajit Pawar on Ladki Bahin Yojana Ekycx
Published On

लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता जमा झाला असला तरी ज्या लाडकीची ई-केवायसी झालीय... त्याचं लाडकीची दिवाळी गोड होणार आहे... पुढच्या 2 महिन्यात लाडक्या बहिणींनी E-KYC ची प्रक्रिया पूर्ण करावीच लागणार आहे..मात्र प्रत्याक्षात ई-केवायसी करताना लाडकीला अनेक अडचणींना सामोरे जावं लागतयं...

गावखेड्यात मोबाईल नेटवर्क नसल्यानं लाडक्या बहिणींना रात्री 2 वाजेपर्यंत जागं रहावं लागतयं...तर दिवसा नेटवर्कअभावी वेबसाईट चालत नसल्यानं लाडकीची डोकेदुखी वाढतेय... एवढचं नव्हे तर नंदूरबारसारख्या आदिवासी पट्ट्यात मोबाईलला नेटवर्क नसल्यानं महिलांना गाव सोडून नर्मदा काठावरील उंच टेकडीवर जाऊन बसावं लागतयं...

Ajit Pawar on Ladki Bahin Yojana Ekyc
Maharashtra Politics : शरद पवारांना धक्का, विश्वासू सहकाऱ्यांने केला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

तांत्रिक अडचणीमुळे पोर्टल बंद झाल्याच्या अनेक तक्रारी लाडक्या बहिणीकडून केल्या जात आहेत. या तांत्रिक अडचणींनी लाडक्या बहिणी पुरत्या बेजारयेत. आधीच या योजनेचा आर्थिक भार राज्य सरकारला पेलवत नाहीय. बोगस लाडकींनी सरकारला लुटल्यानंतर सरकारला ई-केवायईचं शहानपण सुचलं. पणं या ई-केवायसीनं पुन्हा गरजू लाडक्या बहिणींची होणारी फरफट सरकार कसं थांबवणार आणि सन्मान निधीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या लाडकीची दिवाळी गोड होणार का ते पाहणं महत्वाचंय.

Ajit Pawar on Ladki Bahin Yojana Ekyc
Kolhapur : बेल्ट, बॅट, दांडक्याने विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण हॉस्टेलमध्ये भयंकर प्रकार, मारहाणीचे Video समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com