Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ₹३००० येणार? नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता

Ladki Bahin Yojana November-December Installment Come Together: लाडकी बहीण योजनेत महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे. पुढच्या महिन्यात महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा होऊ शकतात.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

नोव्हेंबर- डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार का?

लाडकीला ३००० रुपये एकत्र येण्याची शक्यता

नोव्हेंबर महिना संपायला अवघे ८ दिवस उरले आहेत. त्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार, असा प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत. दरम्यान, राज्यात सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. या काळात पैसे येणार की नाही असा प्रश्न विचारला जात आहेत. अशातच आता लाडक्या बहि‍णींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

लाडकीला नोव्हेंबर-डिसेंबरचे पैसे एकत्र येणार (Ladki Bahin Yojana November-December Installment May Come Together)

नोव्हेंबर महिना संपायला आला तरीही अद्याप हप्त्याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता पुढच्या महिन्यात दोन महिन्याचे हप्ते एकत्र येणार का असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाला आहे.

२ आणि ३ डिसेंबर रोजी नगरपरिषदेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे त्याआधी किंवा त्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. जर या निवडणूकांनंतर पैसे येणार असतील तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येऊ शकतो. मात्र, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.

लाडकीचा हप्ता मिळवण्यासाठी केवायसी गरजेचे (Ladki Bahin Yojana KYC)

लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला केवायसी करणे गरजेचे आहे. तुमच्या केवायसीसाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत तुम्ही केवायसी करु शकतात. जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला त्यानंतरचे १५०० रुपये मिळणार नाहीत. अजूनपर्यंत १ कोटीपेक्षा जास्त लाभार्थी महिलांचे केवायसी करणे बाकी आहे. यामध्ये ज्या महिलांचे पती आणि वडील हयात नाही अशा महिलांचाही समावेश आहे. त्यांच्यासाठी आता नवीन केवायसी प्रोसेस सुरु केली आहे. त्यामुळे आता त्यांची केवायसी होईपर्यंत वेळ लागेल. या कारणांमुळे केवायसीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेअर बाजारात पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाने ४७ लाखांची फसवणूक,राजस्थानहून आरोपी अटकेत

Mangalsutra Designs: पारंपारिक की मॉडर्न? लग्नासाठी मंगळसूत्राच्या कोणत्या डिझाईन शोभून दिसतील?

Tea and Biscuits Combo: चहासोबत बिस्किटं खाल्ल्याने कोणते आजार होऊ शकतात? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात?

PM Mudra Yojana: सरकारची खास योजना! कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार २० लाखांचे कर्ज; कोणाला होणार फायदा?

Samrat Choudhary: लाखोंची एफडी, कित्येक तोळा सोनं,भाजपच्या नवीन मुख्यमंत्र्यांची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT