Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना नोव्हेंबर-डिसेंबरचे ₹३००० मिळणार की नाही? आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य आहे. जर केवायसी केली नाही तर योजनेचा लाभ मिळणार नाहीये. याबाबत आदिती तटकरेंनी माहिती दिली.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट

आदिती तटकरेंनी केवायसीबाबत दिली महत्त्वाची माहिती

केवायसी न केल्यास मिळणार नाही योजनेचा लाभ

डिसेंबर महिनादेखील संपायला अवघे २ दिवस उरले आहेत.डिसेंबर महिना संपला तरीही नोव्हेंबर महिन्याचा हप्तादेखील जमा झालेला नाही. त्यामुळे दोन महिन्याला हप्ता कधी येणार असा प्रश्न महिलांना पडलेला आहे. त्याचसोबत केवायसी करण्यासाठीही शेवटचे दोन दिवस उरले आहेत. महिलांनी जर केवायसी केली नाही तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. याबाबत स्वतः आदिती तटकरेंनी माहिती दिली आहे.

आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या? (Aditi Tatkare Post on Ladki Bahin Yojana)

आदिती तटकरेंनी आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट करत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडपणे सुरु करण्यासाठी ईकेवायसी करणे आवश्यक आहे. यासाठी ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम तारीख आहे. आता शेवटचे ४ दिवस उरले आहेत. सर्व लाडक्या बहि‍णींनी आजच केवायसी करावी ही नम्र विनंती, अशी माहिती आदिती तटकरेंनी दिली. त्यामुळे सर्व लाडक्या बहि‍णींनी केवायसी पूर्ण करायची आहे.

तुम्हाला पैसे मिळणार की नाही? (Ladki Bahin Yojana Will Women Get Money or Not)

लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करावी लागणार आहे. केवायसीची प्रोसेस ऑनलाइन आहे. आतापर्यंत कोट्यवधि महिलांनी केवायसी केली आहे. अजूनही लाखो महिलांची केवायसी बाकी आहे. त्यामुळे ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांनी शेवटच्या दिवसाची वाट पाहू नये. त्यांनी आजच केवायसी पूर्ण करा जेणेकरुन ऐनवेळी कोणतीही अडचण येणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पीडितांना घरे द्याच, अन्यथा भाडे द्या; शुक्ला कंपाउंड तोडक कारवाईवर भाजप नेत्याचा संताप

राज ठाकरेंच्या राजकारणाचे नवे संकेत, शिंदेंसोबत युती, 'लवचिक' झाली नाती

ZP निवडणुकीपूर्वीच भाजपचा नवा डाव ? नाराजांना झेडपीत मागच्या दारानं प्रवेश?

Saturday Horoscope : अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका, अन्यथा...; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात संकटाची चाहुल

शिंदे गटाच्या बड्या नेत्याला अटक, एक वर्षांपासून होता फरार, कायद्याच्या बालेकिल्ल्यात अटकेचा थरार

SCROLL FOR NEXT