Ladki Bahin Yojana Saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: नाशिक, बुलढाण्यातील ZP च्या कर्मचाऱ्यांनी लाटले लाडकीचे पैसे, २ पुरुषांचाही समावेश, धक्कादायक माहिती समोर

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेत सरकारी कर्मचारी महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे. बुलढाण्यातील १९९ सरकारी कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे. आता या महिलांवर कारवाई होणार आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेचा सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ

बुलढाण्यातील १९९ जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्यची माहिती

नाशिकमध्येही ८ कर्मचाऱ्यांनी घेतला योजनेचा लाभ

यामधील २ पुरुष कर्मचारीदेखील असल्याची माहिती

या कर्मचाऱ्यांवर होणार कार्यवाही

लाडकी बहीण योजनेत जिल्हा परिषदेच्या सरकारी कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बुलढाणा जिल्हा परिषद सेवेत असलेल्या 199 महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. सरकारी कर्मचारी असलेल्या लाडक्या बहि‍णींनी नियमाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेतील महिलांनी सरकारचे लाखो रुपये लाटले आहेत.

बुलढाण्यात जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचाऱ्यांनी घेतला योजनेचा लाभ

बुलढाणा जिल्हा परिषदेच्या १९९ महिलांनी योजनेअंतर्गत दर महिन्याला १५०० रुपये घेतले आहेत. याप्रकरणी या सर्व महिलांना अपात्र ठरवून त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार यांनी दिला आहे. त्यामुळे शासकीय सेवेतील या लाभार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

नाशिकमध्ये सरकारी पुरुष कर्मचाऱ्यांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ

नाशिक जिल्हा परिषदेतही लाडक्या बहीण योजनेत घोटाळा झाला आहे.योजनेचा गैरवापर करत तब्बल ८ कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचं उघड झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे म्हणजे लाभार्थ्यांमध्ये दोन पुरुष कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. बोगस लाभार्थ्यांकडून योजनेची रक्कम करण्यात वसूल येणार आहे.योजनेचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत लाडकी बहीण योजनेत सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला आहे. परंतु आता पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांनीही योजनेचा लाभ घेतला आहे. नाशिकमध्ये २ पुरुष कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे. या पुरुषांवर आता कारवाई केली जाणार आहे.

११८१ सरकारी महिलांवर होणार कारवाई

याआधीही लाडकी बहीण योजनेत हजारो जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला आहे. जवळपास ११८१ कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या महिलांवर कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आले आहे. या महिलांवर कार्यवाही करुन त्याचा अहवाल सादर करण्यास महिला व बालविकास विभागाने सांगितले आहे.या अपात्र महिला आणि पुरुषांचे लाभ बंद केले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ESIC Recruitment: सरकारी नोकरीची संधी; ESIC मध्ये भरती सुरु; पगार मिळणार १,०६,००० रुपये; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Buldhana : अतिवृष्टीमुळे शेती गेली खरडून; कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा, शेतकऱ्याचा सरकारला प्रश्न

पुराच्या पाण्यातून घरात साप शिरला, सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू; सोलापुरमध्ये हळहळ

Thane Navratri: ठाण्यातील गरबाचे प्रसिद्ध ठिकाण; पाहा जत्रेचं अप्रतिम दृश्य

SCROLL FOR NEXT