Nashik Corporation : प्रभाग रचना जाहीर होण्यापूर्वीच फुटली; नाशिक शहरात चर्चांना उधाण, ठराविक पक्षाच्या सोयीने केल्याचा आरोप

Nashik News : नाशिक महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर होण्यापूर्वीच प्रभाग रचना फुटल्याची चर्चा असून नाशिकमध्ये सुरू असलेल्या वेगवेगळ्या चर्चांवरून प्रभाग रचनेवरच संशय व्यक्त केला जात आहे
Nashik Corporation
Nashik CorporationSaam tv
Published On

नाशिक : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. यासाठी प्रारूप प्रभाग रचनेकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. मात्र नाशिक महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर होण्यापूर्वीच प्रभाग रचना फुटल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या असून आरोप केली केले जात आहेत. 

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या निवडणूक टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार आहेत. यासाठी महापालिकेकडून प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यात येत आहे. नाशिक महापालिकेकडून देखील प्रभाग रचना तयार करण्यात आली. मात्र हि प्रभाग रचना जाहीर होण्यापूर्वीच फुटल्याचे बोलले जात आहे. 

Nashik Corporation
Pune Police : खाकीला कलंक! अमली पदार्थ विक्रेत्यांसोबत आर्थिक व्यवहार; पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्याचे निलंबन

हरकती घेण्याचा सूचना 

नाशिक शहरात होत असलेल्या चर्चांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी थेट अजित पवारांना या चर्चेची माहिती दिली. त्यामुळे नाशिकमध्ये सुरू असलेल्या चर्चांवरून आता प्रभाग रचनांवरच संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे प्रारूप प्रभाग रचनेत काही अडचण वाटल्यास हरकती घेण्याच्या सूचना अजित पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्याना दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिली. 

Nashik Corporation
Jalna : अवैध विक्रीसाठी जात असलेला गुटखा जप्त; बदनापूर पोलिसांची कारवाई, ८० लाखांचा मुद्देमाल जप्त

नव्याने आराखडा मंत्रालयात दुरुस्ती करून सादर
छत्रपती संभाजीनगर : आगामी महापालिका निवडणुकांसाठी केलेल्या प्रभागरचनेत गंभीर त्रुटी आढळल्या होत्या. यामुळे छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा आराखडा मंत्रालयाने फेटाळला होता. त्यामुळे अवघ्या पंधरा दिवसांच्या अवधीत नव्याने आराखडा तयार करून पुन्हा मुंबईतील नगरविकास विभागाकडे सादर करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार मनपा प्रशासनाने ११५ वॉर्डाचे चारसदस्यीय २८ प्रभाग व तीनसदस्यीय २९ प्रभागांचे आराखडे तयार केले होते. मात्र ६ व ७ ऑगस्ट रोजी मंत्रालयात हे सादरीकरण होताच नगरविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रभागरचनेत गंभीर चुका दाखवून दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com