Jalna : अवैध विक्रीसाठी जात असलेला गुटखा जप्त; बदनापूर पोलिसांची कारवाई, ८० लाखांचा मुद्देमाल जप्त

Jalna Badnapur News : अवैधरित्या गांजा व गुटख्याची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचे राज्यात चार ठिकाणी झालेल्या कारवाईत समोर आले आहे. जालना जिल्ह्यात गुटखा तर अमरावती, सोलापूर व बुलढाणा जिल्ह्यात गांजा जप्त केला
Jalna Badnapur News
Jalna Badnapur NewsSaam tv
Published On

अक्षय शिंदे 

जालना : बंदी असताना देखील छुप्या पद्धतीने गांजा तस्करी केली जात असते. अशा प्रकारे अवैधरीत्या विक्रीसाठी जात असलेला गुटखा बदनापूर पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी २३ लाखांचा गुटखा आणि ट्रक असा ८० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली असून तस्करी होत असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. 

जालन्यातील बदनापूर तालुक्यातील काजळा गावातील एका शेतामध्ये गुटख्याची गाडी उतरवत असल्याची गोपनीय माहिती अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे अप्पर पोलीस अधीक्षक पथक आणि बदनापूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत २३ लाखांचा गुटखा आणि एक ट्रक असा ८० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुटखा माफियांविरोधात बदनापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

Jalna Badnapur News
Ganesh Festival : कागदाचा लगदा, शेणापासून गणेश मूर्ती; २० वर्षापासून पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महिलेचा पुढाकार

अमरावतीत ८ किलो गांजा जप्त
अमरावती : अमरावतीत अंमली पदार्थ विरोधी कारवाईत मोठे यश आले आहे. पंचवटी चौकात पोलिसांनी सापळा रचून २४ वर्षीय युवक नावेद शहा नसीम शहा आणि एका विधी संघर्षग्रस्त बालिकेच्या ताब्यातून तब्बल ८ किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

Jalna Badnapur News
Pune Police : खाकीला कलंक! अमली पदार्थ विक्रेत्यांसोबत आर्थिक व्यवहार; पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्याचे निलंबन

समृद्धी महामार्गावर पकडला 65 लाखांचा गुटखा, एक जण अटकेत
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित असलेल्या गुटखा मेहकर पोलिसांनी सापळा रचून जप्त केला आहे. या कारवाईत ६५ लाखाचा गुटखा आढळून आला आहे. पोलिसांनी गुटख्यासह वाहन असा एकूण ७७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत एका आरोपीला अटक केली आहे. यामध्ये अजून आरोपी वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे, या कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com