Ganesh Festival : कागदाचा लगदा, शेणापासून गणेश मूर्ती; २० वर्षापासून पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महिलेचा पुढाकार

Kalyan News : सध्या शहरात गणेशोत्सवाची तयारी सुरू असून, पीओपीच्या आकर्षक गणेश मूर्तीना पसंती देण्यासोबत भक्तांमध्ये पर्यावरण पूरक अशा गणेश मूर्तींची मोठ्या प्रमाणात मागणी वाढताना दिसत आहे. 
Ganesh Festival
Ganesh FestivalSaam tv
Published On

संघर्ष गांगुर्डे 
कल्याण : प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे निसर्गावर होणारा विपरीत परिणाम आणि जलप्रदूषण टाळण्यासाठी कल्याणमधील एका महिलेने आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. कागदाच्या लगद्यापासून (पेपर पल्प) त्याच बरोबर लाल माती, शेण यापासून सुंदर गणेश मूर्ती बनवून ती गणेशभक्तांना पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध करून देत आहे. मागील २० वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम सुरु आहे. 

गणेशोत्सव साजरा करताना मोठमोठ्या आकर्षक अशा गणेश मूर्तीना पसंती दिली जात असते. सार्वजनिक गणेश मंडळांकडून तर मोठ्या मुर्त्या घेतल्या जात असतात. मात्र घरगुती गणेश स्थापना करण्यासाठी लहान मूर्त्यांना पसंती असते. परंतु या मूर्ती तयार करण्यासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर होतो. या मूर्ती विसर्जनावेळी प्रामुख्याने जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असते. यामुळे अनेकजण पर्यावरण पूरक मूर्तीची प्रतिष्ठापना करत असतात. 

Ganesh Festival
Bhandara Police : पोलीस अधीक्षक कार्यालयात एकाचा आत्महत्येचा प्रयत्न; गोल्ड लोन बँकेने फसवणूक केल्याचा आरोप

आकर्षक व हलक्या मूर्ती 
कल्याणमधील मिनल लेले हि महिला मागील २० वर्षांपासून कागदाचा लगदा व शेणाचा वापर करून गणेश मूर्ती तयार करत आहेत. या मूर्ती केवळ आकर्षक आणि हलक्या वजनाच्याच नसून जल प्रदूषण न करता पाण्यात सहज विरघळतात. त्यामुळे विसर्जनावेळी पर्यावरणाला हानी पोहोचत नाही. सध्या शहरात गणेशोत्सवाची तयारी सुरू असून, भक्तांमध्ये अशा मूर्तींची मोठ्या प्रमाणात मागणी वाढताना दिसत आहे.

Ganesh Festival
Hingoli : महापुरामुळे शेतकऱ्यांचे नुकसान; पोळा सण साजरा न करण्याचा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा निर्णय

भाविकांकडून पसंती 
गणेशभक्तांनी या महिलेकडून तयार होणाऱ्या मूर्तींना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. गणपती बाप्पाच्या आगमनात भक्तीबरोबरच निसर्गाचेही रक्षण व्हावे या हेतूनं अधिकाधिक जण पर्यावरणपूरक मूर्ती खरेदी करण्यास उत्सुक आहेत. नगरातील सामाजिक संघटना देखील या उपक्रमाचे स्वागत करत असून लोकांना प्लॅस्टर ऑफ पॅरिसऐवजी पर्यावरणपूरक मूर्तींची निवड करण्याचे आवाहन करत आहेत. या उपक्रमामुळे गणेशोत्सवाचा आनंद आणि श्रद्धा जपतानाच निसर्गाचेही रक्षण होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com