HIngoli News
HIngoli NewsSaam tv

Hingoli : महापुरामुळे शेतकऱ्यांचे नुकसान; पोळा सण साजरा न करण्याचा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा निर्णय

HIngoli News : हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने पैनगंगा नदीला पूर आला आहे. या पुराचे पाणी शेतांमध्ये शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर अभूतपूर्व आर्थिक संकट कोसळले आहे
Published on

हिंगोली : मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यानुसार हिंगोलीत महापुरामुळे शेतकऱ्यांच्या पोळा सणावर विरजण पसरले असून नुकसानग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांनी पोळा सण साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे पैनगंगा नदीच्या पुरामुळे शेतकऱ्यांवर अभूतपूर्व संकट कोसळले आहे.  ७२ तासापूर्वी शेतकऱ्यांच्या शेतात पिके डोलाने उभी होती. मात्र नदीचे पाणी शेतात गेलं आणि शेताला तळ्याचं स्वरूप आले आहे. पीकही ७२ तास पाण्याच्या खाली दाबल्या गेली आणि त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात शेती पिकांचं मोठं नुकसान झाले आहे.

HIngoli News
Beed Heavy Rain : अतिवृष्टीने शेतकऱ्याचे मोडले कंबरडे; सोयाबीन, कापूस पीक पाण्याखाली, बीड जिल्ह्यात प्रचंड नुकसान

पोळा साजरा न करण्याचा निर्णय 

७२ तासात शेताची नदी झाली आणि सगळं पीक वाहून गेलं तरुण शेतकरी हातबल झाला आहे. हिंगोलीच्या गंगापूर गावच्या शेतकऱ्यांनी पुरामुळे शेतीचे नुकसान झाल्याने पोळा सण न साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पुराच्या पाण्यात शेतीच्या पिकासह सगळेच वाहून गेल्याने सर्जा राजाला गोड घास भरवण्यासाठी काहीच शिल्लक नसल्याची भावना या शेतकऱ्यांनी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केली आहे. 

HIngoli News
Bhandara Police : पोलीस अधीक्षक कार्यालयात एकाचा आत्महत्येचा प्रयत्न; गोल्ड लोन बँकेने फसवणूक केल्याचा आरोप

अंबादास दानवे यांच्या कडून नुकसानग्रस्त शेतीची पाहणी
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हिंगोलीत महापुराने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली आहे. कळमनुरी तालुक्यातील गांगापूर गावच्या शेतकऱ्यांच्या बांधावर अंबादास दानवे पोहोचले. दरम्यान पोळा सणाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या नुकसानीचा चित्र पहावं लागत असल्याने शेतकऱ्यांवरती संकट कोसळल्याच यावेळी दानवे म्हणाले आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com