Pune Police : खाकीला कलंक! अमली पदार्थ विक्रेत्यांसोबत आर्थिक व्यवहार; पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्याचे निलंबन

Pune News : पोलिस शिपाई हा ड्रग्स विक्री प्रकरणातील असलेल्या आरोपींना मदत करत असून सहकारनगर पोलीस स्टेशनचा कलेक्शनचे काम करतो. तसेच तो या गांजा व्यवसायात भागीदार असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली
Pune Police
Pune PoliceSaam tv
Published On

अक्षय बडवे 

पुणे : पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्याचे अमली पदार्थ विक्रेत्यासोबत संबंध असल्याचे समोर आले आहे. या पोलीस कर्मचाऱ्याकडून अवैध धंदे चालवण्यास प्रोत्साहन देत त्यांच्यासोबत आर्थिक व्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात सदर पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणामुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. 

पुणे शहरातील स्वारगेट पोलीस ठाण्यात कार्यरत नवनाथ कांताराम शिंदे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार २० ऑगस्टला पुणे पोलिसांनी सहकारनगर पोलिस ठाण्याचा हद्दीत सुरू असलेल्या हद्दीत अवैध धंद्यावर कारवाई केली. दरम्यान, एका तरुणाकडून यावेळी ५ किलो गांजा मिळून आला होता. तसेच इतर ४ जणांवर अमली पदार्थांच्या विक्री प्रकरणी सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कारवाई करण्यापुर्वी पोलिसांना एक संदेश मिळाला होता. 

Pune Police
Bhandara Police : पोलीस अधीक्षक कार्यालयात एकाचा आत्महत्येचा प्रयत्न; गोल्ड लोन बँकेने फसवणूक केल्याचा आरोप

पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न 

दरम्यान या प्रकरणातील चौकशीमध्ये स्वारगेट पोलीस ठाण्यातील नवनाथ शिंदे या कर्मचार्याचा सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे. संबंधित पोलिस शिपाई हा ड्रग्स विक्री प्रकरणातील असलेल्या आरोपींना मदत करत असून सहकारनगर पोलीस स्टेशनचा कलेक्शनचे काम करतो. तसेच तो या गांजा व्यवसायात भागीदार असल्याचीही चर्चा आहे. अमली पदार्थांच्या व्यवसायात भागीदार असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे थेट NDPS नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले. 

Pune Police
Ganesh Festival : कागदाचा लगदा, शेणापासून गणेश मूर्ती; २० वर्षापासून पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महिलेचा पुढाकार

पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन 

पुणे शहरात सर्व अवैध धंदे बंद झाले आहेत. पण हा पोलीस कॉन्स्टेबल त्याच्या हद्दीत स्पा, पिठा, मटका, क्लब असे सर्व प्रकारचे अवैध धंदे चालवत आहे. असे या मेसेज मधील मजकूर होता. याबाबत अधिक तपास केला असता गांजा विक्री करणाऱ्या एका आरोपीच्या मोबाईलमध्ये नवनाथ शिंदे यांचा नंबर "एन.बी." या नावाने सेव्ह केला होता. यावेळी आरोपीकडे अधिक चौकशी केली असता नवनाथ शिंदे सहकारनगर पोलीस स्टेशन येथे वसुलीचे काम करता असे त्याने सांगितले. यावरून शिंदे यास शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com