Ladki Bahin Yojana canva
बिझनेस

Ladki Bahin Yojana: पात्र असतानाही मार्च-एप्रिलचे ₹3000 आले नाहीत? लाडक्या बहिणींना शेवटची संधी, फक्त करा हे काम

Ladki Bahin Yojana March-April Installment: लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना मार्च- एप्रिलचे ३००० रुपये खात्यात जमा होत आहेत. पण अनेक लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नाहीत. या महिलांना सरकारने शेवटची संधी दिली आहे.

Priya More
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसी अपडेट

  • लाडकी बहीण योजनेचा मार्च- एप्रिलचा हफ्ता आला नसल्याने लाडकी चिंतेत

  • पैसे खात्यात न आलेल्या महिलांना ई-केवायसीची शेवटची संधी

  • लाडकी बहीण योजना कागदपत्र पडताळणी प्रक्रिया

फडणवीस सरकारची महत्वकाक्षी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यावर मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होत आहे. या लाडक्या बहिणींना रखडलेले ३००० रुपये मिळत आहेत. पण ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे आले नाहीत आणि ज्या लाडकींची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे राहून गेले आहे. त्या लाडकींना आता शेवटची संधी आहे. सरकारने या लाभार्थी महिलांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी एक शेवटची मुदत दिली आहे.

लाडकी बहीण योजनेतील महिलांना सरकारकडून ई-केवायसी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अनेक लाभार्थी महिलांना ही प्रक्रिया पूर्ण केली पण ज्या लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांच्या खात्यात पैसे जमा होणे बंद झाले आहेत. सरकारकडून ई-केवायसी करण्यासाठी मुदत वाढ अनेक वेळा करण्यात आली. काही महिलांना ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडले होते त्यांना दुरूस्तीसाठी सरकारने ३० एप्रिल ही अंतिम मुदत दिली होती. अनेक वेळा तारखा वाढवून देखील अनेक महिलांना ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता आली नाही त्यामुळे त्या अपात्र ठरल्या. त्यांच्या खात्यात पैसे येणं बंद झाले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन ई- केवायसीच्या प्रक्रियेसाठी ३० एप्रिल ही शेवटची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ही प्रक्रिया पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता या योजनेसाठी एखाद्या पात्र महिलेला कागदपत्रांची पूर्तता करायची असल्यास जिल्हा महिला विकास विभागात कागदपत्रं सादर करावी लागणार आहे. ही शेवटची संधी महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आली आहे. शेवटची संधी जर हुकली तर या लाडकींच्या खात्यात पैसे येणारच नाहीत.

२०२४ मध्ये फडणवीस सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली त्यावेळी लाडक्या बहिणींची संख्या २ कोटी ४६ लाख इतकी होती. यानंतर पडताळणी प्रक्रियेत दुबार अर्ज, आधार तपशिलातील विसंगती, चुकीची बँक माहिती आणि उत्पन्न पात्रतेचे निकष पूर्ण न करणाऱ्या लाभार्थी महिलांची नावं समोर आली. या योजनेच्या जलद अंमलबजावणीदरम्यान अनियमितता आणि अपुऱ्या छाननीबद्दल चिंता व्यक्त झाल्यानंतर राज्य सरकारने ई-केवायसी अनिवार्य केले होते. त्यानंतर आता ई-केवायसी प्रक्रियेत देखील लाभार्थी महिलांच्या संख्येत आणखी घट झाली. या योजनेमध्ये ७० लाख महिला ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्याने त्याचसोबत इतर कारणांमुळे अपात्र ठरल्या. ई-केवायसी दुरूस्तीनंतर पात्र लाडक्या बहिणींची संख्या १ कोटी ७७ लाखांवर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: 'नीट' परीक्षा पेपर फुटी प्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची हकालपट्टी करा

Gautami Patil New Look: तु तर मोरनी..., गौतमी पाटीलचा साडीतला नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल

मंत्री विखे पाटलांच्या ताफ्यात भला मोठा फौजफाटा; पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली

मुख्यमंत्र्यांसोबत राष्ट्रवादीमधील अंतर्गत वादाची चर्चा? फडणवीसांनी सांगितली पार्थ पवारांच्या भेटीची आतली गोष्ट

शहापूरमधील रूग्णालयातच भिडले दोन गट, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण; डॉक्टर,नर्स उपचार सोडून पळाले

SCROLL FOR NEXT