Ladki Bahin Yojana Saam Digital
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी उरले अवघे काही तास; अशा पद्धतीने करा अर्ज

Siddhi Hande

महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप प्रसिद्ध झाली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ सप्टेंबर होती. मात्र, ही मुदत आता वाढवून १५ ऑक्टोबर करण्यात आली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी शेवटचे काही तास उरले आहेत. या योजनेअंतर्गत ज्या महिलांनी अजूनपर्यंत अर्ज केले नाही. त्यांनी आज अर्ज करावेत.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना फॉर्म भरुन द्यायचा आहे. हा अर्ज मंजूर झाल्यानंतर महिलांच्या खात्यात दर महिन्याला १५०० रुपये जमा केले जाणार आहे. याचाच अर्थ वर्षाला १८००० रुपये जमा करण्यात येणार आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. (Ladki Bahin Yojana Application Last Date)

लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा करायचा?

लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अवघे काही तास उरले आहे. सध्या लाडकी बहीण योजनेचा अर्ज हा फक्त अंगणवाडीत जाऊन करता येणार आहे. तुम्हाला अंगणवाडीत जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.अंगणवाडी सेविकांकडे लाडकी बहीण योजनेचे अर्ज आहेत. हे अर्ज भरुन द्यावे लागणार आहेत. त्यानंतर अंगणवाडी सेविकांनी तुमचे अर्ज मंजूर केल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. अर्ज दाखल करताना तुम्हाला आधार कार्ड, वोटर आयडी,फोटो,रेशन कार्ड या गोष्टींची आवश्यकता आहे. या कागदपत्रांचे झेरॉक्स तुम्हाला जमा करावे लागणार आहेत. फक्त अंगणवाडी सेविकांकडून मंजूर झालेल्या महिलांना पैसे मिळणार आहेत. (Ladki Bahin Yojana Application Process)

लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांच्या खात्यात ७५०० रुपये जमा झाले आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे ३००० रुपये एकत्रितपणे जमा करण्यात आले होते. त्यानंतर १५०० रुपये जमा करण्यात आले. त्यानंतर आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे ३००० रुपये अॅडव्हान्समध्ये देण्यात आले आहे.

दरम्यान, लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लाडकी बहीण योजनत १५०० ऐवजी ३००० रुपये दिले जाऊ शकतात. जर महिलांनी महायुती सरकारला आशीर्वाद दिला तर या योजनेत पैसे वाढवले जाऊ शकतात, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Assembly Election : कुणी शड्डू ठोकला, कुणी गरजला अन् बरसला; अकोल्यात महायुतीत कडकडाट!

Suraj Chavan Movie: प्रेमाच्या नात्यात मित्राची साथ; राजाराणी चित्रपटात सूरज चव्हाणची अनोखी भूमिका

Pune Congress News : कॉंग्रेसचे पुण्यातील 5 उमेदवार ठरले; मोठी अपडेट आली समोर | Marathi News

Accident: नांदेडमध्ये हिट अँड रन; टेम्पोच्या धडकेत वयोवृद्ध पती-पत्नी जागीच ठार, नागरिकांनी रोखला राष्ट्रीय महामार्ग

Curry Leaves Water: दररोज कढीपत्त्याचे पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे!

SCROLL FOR NEXT