Congress Election Manifesto 2024 : महाराष्ट्रमध्ये कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर काँग्रे अॅक्शन मोडवर आलेय. महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांना आज दिल्लीत बोलवण्यात आलेय. राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसची बैठक सुरु झाली आहे. या बैठकीमध्ये जाहीरनामा, जागावाटपावर चर्चा होणार असल्याचे समजतेय. काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीसाठा आपला जाहीरनामा तयार केलाय. त्यामध्ये महायुतीच्या लाडकी बहीण योजनेला (Mazi Ladki Bahin) उत्तर देण्यात येणार असल्याचे दिसतेय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने महाराष्ट्रासाठी महालक्ष्मी योजना (Mahalaxmi Yojana) आखली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना प्रति महिना दोन हजार रुपये देण्याची योजना काँग्रेसने आखली आहे. काँग्रेसचा जाहीरनामा साम टीव्हीच्या हाती आलाय. त्यामध्ये कोणत्या मुद्दायवर भर देण्यात आला, पाहूयात..
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस नेत्यांची दिल्लीत बैठक सुरु झाली आहे. राज्यातील काँग्रेसचे प्रमुख 6 नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा करत आहेत. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, वर्षा गायकवाड बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीत जाहीरनाम्यावर चर्चा होणार आहे.
कृषी समृद्धी शेतकरी सन्मान योजनाः
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचं ३ लाखापर्यंत कर्ज माफ केलं जाणार आहे. ही कर्जमाफी साधारण २८ हजार कोटीची असणार
महालक्ष्मी योजनाः
महिलांना प्रति महिना २००० रूपये दिले जाणार आहेत. यासाठी ६० हजार कोटीचा निधी अपेक्षित आहेत.
स्री सन्मान योजनाः
या योजनेअंतर्गत महिलांना बस वाहतूक सेवा पुर्णपणे मोफत दिली जाणार आहे. या योजनेसाठी १ हजार ४६० कोटीचा निधी अपेक्षित आहे.
कुटुंब रक्षणः
सर्वांना २५ लाख रूपयांचं विमा कवच देण्यात येणार आहे. या योजनेसाठी ६ हजार ५५६ कोटीचा निधी अपेक्षित
युवकांना शब्दः
बेरोजगारांना महिन्याला ४ हजार रूपये दिले जातील. साधारण ६.५ लाख युवकांना हा भत्ता दिला जाणार
समतेची हमीः
दलित, अल्पसंख्याकांसाठी विशेष योजना राबवल्या जाणार आहेत. या योजनेअंतर्गत साधारण ८.५ कोटी लोकांना फायदा होईल, असा दावा आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.