Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: KYC केली तरीही 'या' लाडक्या बहिणींना मिळणार नाही ₹१५००; कारण काय? वाचा

Ladki Bahin Yojana KYC Update These Women will not Get Benefit: लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. दरम्यान, आता केवायसी केलेल्याही काही महिलांचे लाभ बंद होणार आहेत. यामागचे कारण जाणून घ्या.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट

केवायसी केले तरी या महिलांचा लाभ होणार बंद

महिलांचे १५०० बंद होण्यामागची कारणे

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना खूप लोकप्रिय झाली आहे. आतापर्यंतची सर्वात यशस्वी योजना ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे. या योजनेत तब्बल अडीच कोटी महिलांनी लाभ घेतला आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजनेसाठी काही नियम आहेत. जर तुम्ही या नियमात बसत असाल तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेत केवायसीकरणे अनिवार्य केले होते. दरम्यान, केवायसी न केलेल्या महिलांचे लाभ बंद होणार आहे. त्याचसोबत केवायसी केलेल्याही काही महिलांचे लाभ बंद केले जाणार आहेत.

केवायसी केले तरी या महिलांचा लाभ होणार बंद (Ladki Bahin Yojana KYC Done Still Women Not Get Money)

लाडकी बहीण योजनेत प्रत्येक लाभार्थी महिलेला केवायसी करणे अनिवार्य होते. याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ होती. त्यानंतर आता कोणालाही केवायसी करता येणार नाही. या योजनेत केवायसी केले तरीही काही महिलांचा लाभ बंद केला जाऊ शकतो.

लाडक्या बहिणींचे १५०० बदं होणार; कारण काय? (Ladki Bahin Yojana Women Benefit Stoppes Know the Reason)

लाडकी बहीण योजनेत केवायसीद्वारे महिलांच्या अर्जांची किंवा माहितीची पडताळणी केली जाणार आहे. यातून ज्या महिला अपात्र ठरतील त्यांचा लाभ बंद केला जाईल. या केवायसीद्वारे महिलांच्या व त्यांच्या वडिलांची किंवा पतीच्या उत्पन्नाची पडताळणी केली जाणार आहे. यातून ज्या महिलांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे त्यांचा लाभ बंद होईल. याचसोबत ज्या महिला वयोमर्यादेत बसत नाही त्यांचाही लाभ बंद केला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambarnath: मोठी बातमी! अंबरनाथमध्ये भाजपसोबत युती करणाऱ्या काँग्रेसच्या १२ नगरसेवकांचं निलंबन, उलटफेर होणार?

black & white : महापालिका निवडणुकीत शिवसेना यशस्वी होईल का? ठाकरेंनी दिले थेट उत्तर, म्हणाले...

ICC ultimatum Bangladesh: भारतात खेळा किंवा पॉईंट्स गमवा; ICC कडून थेट बांगलादेशाच्या क्रिकेट बोर्डला अल्टिमेटम

Makar Sankranti Decoration Ideas: कमी खर्चात करा हटके डेकोरेशन, यंदा मकरसंक्रांतीला सजवा तुमचं घर

Maharashtra Live News Update: घड्याळाला मतदान करा म्हणत अजित पवारांचा शिवसैनिकांना सॅल्यूट

SCROLL FOR NEXT