Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार जूनचा हप्ता, सोबतच मिळणार लोन

Ladki Bahin Yojana June Month Installment Date: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता पुढच्या आठ दिवसांत महिलांच्या खात्यात जूनचा हप्ता जमा होणार आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. लाडकी बहीण योजना सुरु होऊन आता १ वर्ष पूर्ण होईल. ११ वा हप्ता कधी येणार असा प्रश्न सर्वजण विचारत आहेत. परंतु अजूनही याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे महिला चिंतेत आहेत. दरम्यान, पुढच्या आठ दिवसांत महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. (Ladki Bahin Yojana June Month Installment)

जून महिना संपायला अवघे ८ दिवस उरले आहेत. या दिवसांत कधीही महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. पुढच्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात १५०० रुपये जमा होतील, असं सांगण्यात येत आहे. दरम्यान, याचसोबत लाडक्या बहि‍णींसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

लाडक्या बहि‍णींना मिळणार कर्ज (Ladki Bahin Yojana Women Get Loan)

लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता लाभार्थी महिलांसाठी अजून एक योजना सुरु करण्यात येणार आहे. मध्यंतरी एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले होते की, सरकार लवकरच नवीन योजना सुरु करणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ४०,००० रुपयांपर्यंतचे बँक लोन देईल. यामधून महिला स्वतः चा व्यवसाय सुरु करतील. याबाबत विविध बँकांशी बोलणं सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

महिलांना कसं मिळणार लोन? (Ladki Bahin Yojana Loan Scheme)

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी संबंधित बँकेत जाऊन अर्ज करावेत.

लोनसाठी अर्ज करताना महिलांना आपल्या बिझनेससंबंधित माहिती द्यावी लागणार आहे.

महिलांना जे १५०० रुपये मिळतात. त्यातूनच लोनचे हप्ते भरले जाणार आहे. जेणेकरुन महिलांवर पैशांचा अतिरिक्त भार पडणार नाही.

पात्रता (Ladki Bahin Yojana Eligibility)

महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी.

महिलांचे वय हे २१ ते ६५ वयोगटातील असावे.

महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे.

महिलांकडे कोणत्याही प्रकारचे चारचाकी वाहन नसावे.

महिलांच्या कुटुंबातील कोणतेही सदस्य सरकारी नोकरी करत नसावे.

लाभार्थी महिलांनी इतर कोणत्याही सरकारी योजना लाभ घेतलेला नसावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: 'या' ५ सवयी अंगीकारा आणि जीवनात मिळवा मोठे यश

Bank Jobs: इंडियन ओवरसीज बँकेत नोकरीची संधी, ७५० पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Maharashtra Live News Update: इंडिया आघाडीचा आज निवडणूक आयोगावर मोर्चा

Suyash Tilak : मराठमोळ्या अभिनेत्याच्या गाडीचा अपघात; तासाभराने मिळाली मदत, पाहा VIDEO

Buldhana Shivsena Melava : शिवसेना मेळाव्याच्या बॅनरवरून एकनाथ शिंदेंचा फोटो गायब, संजय गायकवाड नाराज? बुलढाण्यात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT