Dhanshri Shintre
योग दिन दरवर्षी 21 जून साजरा होतो, जो वर्षातील सर्वात मोठा दिवस म्हणून ओळखला जातो.
याला उन्हाळी संक्रांती म्हणतात, जी दक्षिणायनामध्ये सूर्याच्या संक्रमणाचे प्रतीक आहे.
हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असल्याने ध्यान, योग आणि अध्यात्म साधनेसाठी विशेषपणे निवडण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता.
त्यांच्या प्रस्तावावर विचार करून 11 डिसेंबर 2014 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यास मान्यता देण्यात आली.
तेव्हापासून 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून दरवर्षी उत्साहाने साजरा केला जातो.
यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम आहे ‘एक योगा, एक पृथ्वी आणि एक आरोग्य’ ही प्रेरणादायक घोषणा.
2025 मध्ये जागतिक योग दिनाचा ११ वा वर्धापन दिन साजरा होणार असून हा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.