Dhanshri Shintre
घरकाम किंवा ऑफिसची धावपळ असो, महिलांसाठी योग हा तंदुरुस्ती राखण्याचा उत्तम पर्याय आहे. कोणती योगासने उपयुक्त ठरतात ते जाणून घ्या.
ताडासन केल्याने उंची वाढण्यास मदत होते, पाठीचा कणा ताठ राहतो आणि शरीराची पोश्चर सुधारते.
भुजंगासन केल्याने पाठीचा कणा मजबूत होतो, पाठदुखी कमी होते आणि महिलांमध्ये पाळीशी संबंधित त्रासांपासून दिलासा मिळतो.
बालासन केल्याने तणाव कमी होतो, मानसिक शांतता लाभते आणि शरीरातील थकवा दूर होण्यास मदत होते.
वज्रासन केल्याने अन्न पचण्याची प्रक्रिया सुधारते, गॅस आणि पोटफुगीसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
ब्रिज पोझ म्हणून ओळखले जाणारे हे आसन पाठीचा कणा बळकट करते आणि हार्मोनल संतुलन राखण्यास उपयुक्त ठरते.
हे आसन स्तनाचा आकार कमी करण्यात मदत करते, पाठदुखी आणि पाळीशी संबंधित त्रासांपासून आराम मिळवण्यासाठी उपयुक्त ठरते.
हे आसन पाठीचा कणा लवचिक ठेवते, चरबी कमी करते, स्नायूंना टोन करते आणि शरीराचा थकवा दूर करण्यात मदत करते.
अर्ध मत्स्येंद्रासन कंबर-पोटाची चरबी कमी करून स्नायूंना लवचिक बनवते आणि शरीराला सुडौल ठेवण्यास मदत करते.
शवासन केल्याने संपूर्ण शरीर रिलॅक्स होते, तणाव दूर होतो आणि मानसिक व शारीरिक थकवा कमी होतो.