Ladki Bahin Yojana  Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर ₹१५०० जमा, जूनच्या हप्त्याचे पैसे तुम्हाला आले का? लगेच अकाऊंट तपासा

Ladki Bahin Scheme June installment credited : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा ₹१,५०० हप्ता पात्र महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तुमच्या खात्यात पैसे आले का, ते घरबसल्या तपासा.

Namdeo Kumbhar

Mazi Ladki Bahin Yojana June installment : राज्यभरातील कोट्यवधि महिलांच्या खात्यावर 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'चा जूनचा हप्ता जमा झाला आहे. आज सकाळपासून पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर १५०० रूपये जमा होण्यास सुरूवात झाली आहे. खात्यात पैसे जमा होत असल्याने महिला वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. तुमच्या खात्यात हे पैसे आले आहेत की नाही, हे तुम्ही लगेच तपासून पाहिले पाहिजे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यापासून महिलांनी अर्ज भरण्यासाठी सेतू केंद्र आणि अंगणवाड्यांमध्ये प्रचंड गर्दी केली होती. छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्या महिलांचे अर्ज मंजूर (Approved) झाले आहेत, त्यांच्या खात्यावर थेट DBT द्वारे पैसे पाठवले जात आहेत. पहिल्या टप्प्यात लाखो भगिनींच्या खात्यात ही रक्कम जमा झाली आहे. पुढील २ ते ३ दिवसात राज्यातील सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर १५०० रूपये जमा होतील. तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले का? हे तात्काळ तपासून पाहावे.

पैसे आले नसतील तर काय करावे?

जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल, पण अजून खात्यात पैसे आले नसतील, तर अजिबात काळजी करू नका. ही रक्कम टप्प्याटप्प्याने महिलांच्या खात्यावर वर्ग केली जात आहे. त्यामुळे पुढील २४ ते ४८ तासांत उर्वरित महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील.

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक (Aadhaar Seeding) असणे आणि डीबीटी (DBT) पर्याय सुरू असणे अनिवार्य आहे. जर तुमचे खाते आधारशी लिंक नसेल, तर त्वरित बँकेत जाऊन ते सक्रिय करून घ्या, जेणेकरून तुमचा हप्ता अडकणार नाही.

तुमच्या खात्यात पैसे आले की नाही, घरबसल्या तपासा -

तुमच्या बँकेशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ₹१,५०० जमा (Credited) झाल्याचा मेसेज आला आहे का, ते सर्वप्रथम तपासा.

तुमच्या बँकेच्या अधिकृत ॲपवर (उदा. YONO SBI, Baroda M-Connect इत्यादी) लॉग इन करून स्टेटमेंट तपासा किंवा बँकेत जाऊन पासबुक अपडेट करा.

तुम्ही Google Pay, PhonePe किंवा Paytm वापरत असाल, तर तिथूनही बँक बॅलन्स चेक करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhishek Sharma: ‘माझं एकच ध्येय...’ अभिषेक शर्माच्या या वक्तव्याने वेधलं सर्वांचं लक्ष, नेमकं काय म्हणाला?

Gold Price Today: पितृपक्षात सोनं झालं स्वस्त; २२,२४ कॅरेट सोन्याचे दरात मोठी घसरण, पाहा तुमच्या शहरातील आजचे रेटस

Maharashtra News Live Update: कोकणात दुष्काळाच्या झळा; पावसाअभावी भातशेती संकटात, पंपाने पाणी देत शेतकऱ्याची शेती वाचवण्याची धडपड

Drishyam 3 Collection : अजय देवगण बॉक्स ऑफिसचा बादशाह; ४ दिवसांत 'दृश्यम ३'ची ३०० कोटी पार कमाई

२ बड्या नेत्याचं तिकिट कापले, आता मंत्रिमंडळातूनही पत्ता कट, मोदी कॅबिनेटमध्ये ४ नव्या मंत्र्यांची एन्ट्री होणार?

SCROLL FOR NEXT