Ladki Bahin Yojana google
बिझनेस

Ladki Bahin Yojana: तुमच्या खात्यात जूनच्या हप्त्याचे १५०० रुपये जमा झाले का? आता जुलैचे पैसे कधी मिळणार?

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली आहे. जुलै हप्ता, ई-केवायसी, पात्रता आणि लाभार्थी यादीबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात १५ जुलैपासून जून महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली. राज्य सरकारकडून टप्प्याटप्प्याने पात्र महिलांच्या बँक खात्यात रक्कम पाठवली जाते. पण अनेक महिलांना सध्या फक्त एक महिन्याच्या हप्त्याचा SMS प्राप्त झालेला आहे. तर जुलै महिन्याचा हप्ता अजून जमा झालेला नाही.

यापूर्वी जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे ३००० रुपये एकाच वेळी मिळतील अशी चर्चा होती. पण सध्या फक्त जून महिन्याचे १५०० रुपयेच जमा होत आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १५ ऑगस्टआधी जुलै महिन्याचा हप्ता येण्याची शक्यता आहे.

तसेच या योजनेचा लाभ सुरुवातीला अडीच कोटी महिलांना मिळत होता. मात्र पात्रता पडताळणी आणि ई-केवायसी प्रकियेनंतर ९२ लाख महिलांची नावं लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे सध्या जवळपास १.५ कोटी महिलांनाच या योजनेचा लाभ मिळत आहे. ज्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण केले नाही, किंवा योजनेच्या पात्रता अटी पूर्ण केल्या नाहीत, त्यांची नावे यादीतून काढण्यात आली. तसेच ई-केवायसीतल्या त्रुटींमुळे ६० लाख महिलांना लाभापासून वगळ्यात आलं.

पण पात्र असूनही ज्यांची नावे चुकीने वगळली गेली आहेत, त्यांच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. महिला व बालविकास विभागाकडून अशा प्रकरणांचे क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू करण्यात येणार असून पात्र महिलांची नावे पुन्हा योजनेत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

तसेच संजय गांधी निराधार योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनांसाठी अर्ज करूनही कोणत्याही योजनेचा लाभ न मिळालेल्या महिलांनाही किमान एका योजनेचा लाभ मिळावा, यासाठी राज्य सरकार सकारात्मक विचार करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमास्थळी नागरिकांची गर्दी जमायला सुरू

Elaichi banana : आकाराने छोटी पण गुणांनी भारी! इलायची केळी खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का?

शिवसेना अन् धनुष्यबाण कुणाला मिळणार? सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर असीम सरोदेंचा सर्वात मोठा दावा

LPG Price Today: पुन्हा सिलेंडर स्वस्त झाला की ग्राहकांची निराशा? आजचे नवे रेट आले समोर

Silent Heart Attack: या 6 व्यक्तींना सायलेंट हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो?

SCROLL FOR NEXT