Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यात ₹१५०० जमा, फक्त याच महिलांना मिळणार जानेवारीचा हप्ता, कारण काय?

Ladki Bahin Yojana January Installment Update: लाडकी बहीण योजनेत जानेवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, फक्त काही महिलांनाच १५०० रुपये मिळणार आहेत. यामागचे कारण जाणून घ्या.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी

जानेवारीचा हप्ता जमा

फक्त या महिलांनाच मिळणार लाभ

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जानेवारीचा हप्ता महिलांना मिळाला आहे. दरम्यान, सर्व लाभार्थी महिलांना हप्ता मिळणार नाहीये. काही महिलांनाच योजनेअंतर्गत जानेवारीचा हप्ता दिला जाणार आहे. यामागे काही कारणे आहेत.

फक्त या महिलांनाच मिळणार लाभ

लाडकी बहीण योजनेत फक्त पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. याचसोबत ज्या महिलांनी केवायसी केले आहे त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य केले होते. तरीही अनेक महिलांनी केवायसी केले नाहीत. जवळपास ८४ लाख महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये. यातील काही महिलांनी केवायसी केलेले नाहीये. त्यामुळे त्यांचा लाभ बंद करण्यात आला आहे.

या महिलांना मिळणार नाही जानेवारीचा हप्ता

लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले होते. केवायसी न केलेल्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. याचसोबत ज्या महिलांनी खोटी माहिती देऊन योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची माहिती केवायसीमध्ये समोर आली आहे. त्यामुळे त्या महिलांचाही लाभ बंद केला आहे. याचसोबत ज्या महिलांची केवायसीमध्ये चूक झाली आहे त्यांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आला आहे. त्यांना काही दिवसांनी पैसे दिले जातील.

जानेवारीचा हप्ता जमा झाला की नाही? (Ladki Bahin Yojana January Installment Recieve or Not)

काल संध्याकाळपासूनच योजनेअंतर्गत जानेवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये काही महिलांना पैसे मिळाले आहे. काही महिलांच्या खात्यात आज पैसे जमा होतील. ज्या महिला पात्र नाहीत त्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार नाहीत. त्यामुळे तुम्ही जर पात्र असाल आणि केवायसी केली असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT