Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: उरले शेवटचे १० दिवस! अजून जानेवारीचा हप्ता नाही; लाडक्या बहि‍णींना ₹३००० कधी मिळणार?

Ladki Bahin Yojana January-February Installment Update: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्र दिला जाऊ शकतो.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी

जानेवारी-फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार?

या दिवशी खात्यात येऊ शकतात पैसे

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जानेवारीच्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. आता फेब्रुवारीचा महिना संपायला अवघे १० दिवस उरले आहेत तरीही पैसे जमा झाले नाही. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. लाडकी बहीण योजनेत जानेवारी- फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला आहे.

जानेवारी-फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार? (Ladki Bahin Yojana January February Installment Date)

लाडकी बहीण योजनेत जानेवारीचा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला येणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, अजूनही पैसे जमा झालेले नाहीत.जानेवारीनंतर आता फेब्रुवारीच्या हप्त्याचीही महिला वाट पाहत आहे. लाडक्या बहि‍णींना ३००० रुपये एकत्र येऊ शकतात.

लाडकी बहीण योजनेत आता जानेवारी- फेब्रुवारीचा हप्ता लांबणीवर जाऊ शकतो. हा हप्ता मार्च महिन्यात दिला जाऊ शकतो. होळीच्या मूहूर्तावर महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात. २ आणि ३ मार्च रोजी होळी आहे. त्यामुळे त्या कालावधी पैसे दिले जाण्याची शक्यता आहे. याबाबत अधिकृत माहिती अजूनही समोर आलेली नाही.

या महिलांना मिळणार ₹६००० (Ladki Bahin Yojana These Women Will Get 6000 Rupees)

लाडकी बहीण योजनेत काही महिलांना ६००० रुपये दिले जाणार आहेत. चार महिन्याचे पैसे एकत्र देण्यात येतील. केवायसीमध्ये चुका झाल्यामुळे महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. त्यानंतर केवायसीमध्ये दुरुस्ती केल्यानंतर सर्व रखडलेले हप्ते दिले जातील, असं सांगण्यात येत आहे. महिलांना ४ महिन्याचे पसे एकत्र येऊ शकतात. याबाबतही अधिकृत माहिती लवकरच समोर येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर आणखी एक धक्का; विमान तिकीट दर गगनाला भिडले, VIDEO

17 कोटींची चांदी घेऊन जाणारी व्हॅन पलटी; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खळबळ|VIDEO

पुण्यातील रूग्णालयात टायमर बॉम्ब का ठेवला? आरोपीनं ATS ला शब्द ना शब्द सांगितलं, कारण ऐकूण पोलीस हादरले

Monsoon 2026: गुड न्यूज! २४ तासांत मान्सून धडकणार, पुढील ४ दिवस महाराष्ट्रात तुफान पाऊस

आदेश बांदेकरांच्या सुनेला पाहिलात का? दिसतेय जणू इंद्राची अप्सरा

SCROLL FOR NEXT