

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी
जानेवारी-फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार?
या दिवशी खात्यात येऊ शकतात ₹३०००
फेब्रुवारी महिन्याचे १५ दिवस उलटून गेले आहेत. तरीही अजून मागच्या महिन्याचा म्हणजे जानेवारीचा हप्ता जमा झालेला नाही. त्यात आता फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार असाही प्रश्न विचारला जात आहे. जानेवारीचा हप्ता लांबणीवर गेल्यामुळे लाभार्थी महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. लाडकी बहीण योजनेचा जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येण्याची शक्यतादेखील वर्तवली जात आहे. मात्र, हा हप्ता येणार कधी असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
लाडकीच्या हप्त्याची संभाव्य तारीख (Ladki Bahin Yojana Installment Tentative Date)
लाडकी बहीण योजनेत जानेवारीचा हप्ता लांबणीवर गेला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीआधी पैसे येतील, अशी अपेक्षा होती. मात्र, पैसे अजूनही आलेले नाहीत. त्यामुळे दोन हप्ते एकत्र देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता महिनाअखेरीस एकत्रित येऊ शकतो. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ३००० रुपये एकत्र दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, लवकरच घोषणा केली जाईल. हा हप्ता फक्त केवायसी पूर्ण केलेल्या महिलांनाच मिळणार आहे. ज्या महिला पात्र आहेत त्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत.
या महिलांना मिळणार ६००० रुपये (Ladki Bahin Yojana These Women Will get 6000 Rupees)
लाडकी बहीण योजनेत केवायसी करताना अनेक महिलांच्या चुका झाल्या आहेत. या चुका सुधारण्याची संधी त्यांना देण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत महिला केवायसीमधील चुका दुरुस्त करु शकतात. चुका दुरुस्त झाल्यानंतर महिलांना रखडलेले ४ हप्ते एकत्र दिले जाऊ शकतात. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र दिला जाणार आहे. मार्चनंतर हे ६००० रुपये महिलांच्या खात्यात जमा केले जातील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.