Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना रखडलेले हप्ते मिळणार; सरकारने घेतला मोठा निर्णय

Ladki Bahin Yojana January-February Installment Update: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता जानेवारी-फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी निधी हस्तांतरित करण्यात आला आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबात महत्त्वाची बातमी

रखडलेले हप्ते मिळण्याचा मार्ग मोकळा

सामाजिक न्याय विभागाकडून निधी हस्तांतरित

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता महिलांच्या रखडलेल्या हप्त्याबाबत अपडेट आली आहे.आता लवकरच महिलांना रखडलेले हप्ते मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेत महिलांना जानेवारी- फेब्रुवारीचा हप्ता दिला नाहीये. आता हे हप्ते येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पात्र लाडक्या बहि‍णींना लवकरच जानेवारी-फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे, असं सांगितलं जात आहे. दरम्यान, जानेवारीचा हप्ता जमा होण्यास कालपासून सुरुवात झाली आहे. त्यानंतर फेब्रुवारीचा हप्ता दिला जाणार आहेत. हा हप्ता जमा करण्यासाठी सरकारने निधीची व्यवस्था पूर्ण केली आहे.

नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आचारसंहिता होती. त्यामुळे योजनेचा हप्ता जमा होण्यास उशिर झाला होता. मात्र, आता निवडणुका संपल्यानंतर ही प्रक्रिया जलद केली आहे.

सामाजिक न्याय विभागाकडून निधी वळवला

आता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी सरकारने सामाजिक न्याय विभागाच्या खात्यातून महिला व बालविकास विभागाकडे निधी वितरित केला जाणार आहे. एकूण ९८.२५ कोटी रुपये हस्तांतरित केले आहे. यानंतर महिलांना हप्ता मिळणार आहे.

केवायसीसाठी मुदतवाढ

केवायसीमध्ये चुका असल्यामुळे कोट्यवधी महिलांना योजनेचा लाभ मिळाला नाही. आता या महिलांना केवायसी करण्यासाठी ३१ मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. तोपर्यंत तुम्ही केवायसी करुन माहिती अपडेट करा. अन्यथा तुमचाही लाभ बंद होईल. दरम्यान, या महिलांचे डिसेंबरपासूनचे हप्ते रखडलेले आहे. या महिलांना केवायसी केल्यानंतरच एकत्र पैसे दिले जातील, असं सांगितलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT