Ladki Bahin Yojana Saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे ₹१५०० बंद होणार, ई-केवायसीबाबत सरकारने दिली महत्वाची अपडेट

Ladki Bahin Yojana e-KYC Update: लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३० एप्रिल ही शेवटची तारीख आहे. त्या आधी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर १५०० रुपये येणं बंद होईल.

Priya More

Summary -

  • ई-केवायसीसाठी ३० एप्रिल अंतिम तारीख

  • २६ लाख महिलांनी अजून प्रक्रिया पूर्ण झाली नाही

  • १५०० रुपये बंद होण्याची शक्यता

  • दोन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

महाराष्ट्र सरकारची महत्वकांक्षी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. ई-केवायसी करण्यासाठी लाडक्या बहिणींकडे आता फक्त २ दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. जर त्यांनी ई-केवायसीचे काम पूर्ण केले नाही तर त्यांना दरमहिन्याला १५०० रुपये मिळणं बंद होणार आहे. अशामध्ये आज सरकारकडून लाडक्या बहिणींना अलर्ट देण्यात आला आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३० एप्रिल २०२६ ही शेवटची तारीख आहे, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

राज्यातील फडणवीस सरकारने दीड वर्षांपूर्वी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. राज्यातील २ कोटींपेक्षा जास्त महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. पण या योजनेचा गैरफायदा घेतला जात असल्याची बाब लक्षात आल्यानंतर सरकारने ई-केवायसी प्रक्रिया करणं अनिर्वाय केले. ई-केवायसी करण्यासाठी सरकारने ३० एप्रिलपर्यंतची मुदतवाढ दिली.

राज्यातील २६ लाख महिलांनी अजूनही ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे या लाडक्या बहिणींना १५०० रुपये येणं बंद होणार आहे. त्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली तर त्यांना पैसे मिळतील. ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लाकींची पळापळ सुरू आहे. पुढच्या दोन दिवसांत त्यांना ही ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. महत्वाचे म्हणजे सरकारने आतापर्यंत लाडकींना ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३ वेळा मुदतवाढ दिली आहे. असे असतानाही २६ लाख लाडकींनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे त्यांना ३० एप्रिलपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

लाडक्या बहिणी सध्या मार्चचे १५०० रुपये कधी मिळणार याची वाट पाहत आहेत. एप्रिल महिना संपत आला तरी देखील लाडक्या बहिणींना एप्रिलचे पैसे मिळाले नाहीत. पण आता लाडक्या बहिणींना एप्रिल आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे ३००० रुपये एकत्रित मिळणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे. पण हे पैसे कधी मिळणार याची अधिकृत तारीख अद्याप सरकारकडून जाहीर करण्यात आली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात बीडीडीएस कडून संपूर्ण पालिका इमारतीचा तपास पूर्ण

Best Bus Accident : पुन्हा बेस्ट बसचा अपघात, २ जणांना चिरडले, व्हिडिओ समोर आला

Varicose Veins: पायातील वेदना असू शकतात व्हेरिकोज व्हेन्सचं लक्षण असू शकतं; डॉक्टरांनी सांगितले महत्त्वाचे उपाय

मोठी बातमी! विधान भवन, पुण्यातील महापौर कार्यालय आणि RSS कार्यालय बॉम्बनं उडवण्याची धमकी

Beed Boat Accident : बीडमध्ये काळीज हेलावणारी दुर्घटना! ५० ते ६० भाविकांची बोट गोदावरी नदीत उलटली; अनेक जण बुडाल्याची भीती

SCROLL FOR NEXT