Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: प्रतिक्षा संपली! लाडक्या बहि‍णींना फेब्रुवारीचे ₹१५०० लवकरच मिळणार; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

Ladki Bahin Yojana February Installment Update: मार्च महिना संपत आला तरीही महिलांच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता जमा झाला नाही. आता लवकरच महिलांना पैसे मिळणार आहेत. राज्य सरकारने यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

फेब्रुवारीचा हप्ता लवकरच मिळणार

राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

मार्च महिना संपत आला तरीही लाडक्या बहि‍णींना अजूनही फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला नाही. लाभार्थी महिलांना पैसे न मिळाल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महिलांना पैसे कधी येणार, याचसोबत आता फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र येणार का असाही प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, राज्य सरकारने याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

फेब्रुवारीचा हप्ता लवकरच मिळणार (Ladki Bahin Yojana February Installment Date)

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना फेब्रुवारीचा हप्ता लवकरच मिळणार आहे. राज्य सरकारने १५०० रुपयांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी निधी वितरित केला जात आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने योजनेच्या हप्त्यासाठी २७७ कोटी रुपये वर्ग करण्यास मान्यता दिली आहे. हा निधी महिला व बाल विकास विभागाच्या अर्थसंकल्पीय निधीत वर्ग करण्यास शासन मान्यता मिळाली आहे. त्यामुळे काही दिवसात लाडक्या बहि‍णींच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे.

कोणाला मिळणार लाभ? (Ladki Bahin Yojana February Installment Update)

मार्च महिना संपत आला तरीही पैसे न जमा झाल्याने महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. याचसोबत पैसे कोणाला मिळणार असाही प्रश्न विचारला जात आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा फक्त ज्या महिला निकषात बसतात त्यांनाच मिळणार आहे. याचसोबत ज्या महिलांनी केवायसी केली आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्यांच्या केवायसीमध्ये चुका झाल्या आहेत त्यांनी ३१ मार्चपर्यंत दुरुस्ती करायची आहे. अन्यथा त्यांचा लाभ कायमचा बंद केला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad: कारने वाहतूक पोलिसासह तिघांना उडवलं, मुंबई-गोवा महामार्गावरील थरारक घटना

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

SCROLL FOR NEXT