Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: मार्च महिना सुरु तरीही फेब्रुवारीचा हप्ता आला नाही, लाडक्या बहि‍णींना ₹१५०० कधी येणार?

Ladki Bahin Yojana February Installment Update: लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीच्या हप्त्याची महिला वाट पाहत आहेत. दरम्यान, फेब्रुवारीचा हप्ता अजूनच लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबात महत्त्वाची बातमी

फेब्रुवारीचा हप्ता लांबणीवर जाणार

महिलांना कधी मिळणार ₹१५००?

फेब्रुवारी महिना संपला आहे. त्यानंतर मार्च महिना सुरु झाला आहे तरीही महिलांच्या खात्यात मागच्या महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. २०२४ मध्ये ही योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेत जानेवारीपर्यंतचे हप्ते देण्यात आले आहेत. जानेवारीचा हप्तादेखील लांबणीवर गेला होता. त्यानंतर आता फेब्रुवारी महिना संपला तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे.

फेब्रुवारीचा हप्ता लांबणीवर (Ladki Bahin Yojana February Installment Delay)

लाडकी बहीण योजनेत जानेवारीनंतर आता फेब्रुवारीचा हप्तादेखील लांबणीवर गेला आहे. मार्च महिना सुरु झाला तरीही खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. दरम्यान, एका बाजूला फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र येईल, असं सांगितलं जात होतं. असंही काहीही झालेलं नाही त्यामुळे महिलांच्या मनात नाराजी निर्माण झाली आहे.

दर महिन्याला हप्ता पुढे जात आहे. महिलांना हप्त्यासाठी खूप दिवस वाट पाहावी लागते.आताही महिलांना वाट पाहावी लागणार असल्याचे दिसत आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात जानेवारीचा हप्ता देण्यात आला होता. त्यामुळे हा हप्तादेखील लांबणीवर जाईल.

या महिलांना मिळणार एकत्र ४ हप्ते (These Women Get 6000 Rupees Together)

लाडकी बहीण योजनेत केवायसी करणे अनिवार्य केले आहेत. दरम्यान, केवायसी केल्यानंतरही अनेक महिलांच्या चुका होत्या. यामुळे त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. यामुळेच सरकारने केवायसीमधील दुरुस्तीसाठी मुदत वाढवून दिली आहे. ३१ मार्चपर्यंत केवायसी करायची आहे. ही केवायसी झाल्यानंतर रखडलेले सर्व हप्ते महिलांच्या खात्यात जमा केले जातील. ४ महिन्यांचे ६००० रुपये एकत्र येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: विद्यार्थ्यांना घेऊन जणारी बस दरीत कोसळली, २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

'सिनेमॅटिक' रिलवरून वाद पेटला; चमकेश तहसीलदार प्रतीक्षा तेजनकरांच्या निलंबनाची मागणी

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

SCROLL FOR NEXT