Ladki Bahin Yojana eKYC Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana eKYC: आधार नंबर टाकूनही ओटीपी येत नाही; लाडक्या बहिणींना ईकेवायसी करताना अडचणी

Ladki Bahin Yojana eKYC Error: लाडकी बहीण योजनेत ईकेवायसी करण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरले आहेत. दरम्यान, आता केवायसी करताना महिलांना तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी उरले शेवटचे दोन दिवस

केवायसी करण्यात महिलांना अडचणी

केवायसी न केल्यास महिलांचा लाभ होणार बंद

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता लाडकी बहीण योजनेत केवायसीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी अवघे २ दिवस उरले आहेत. अजूनही अनेक महिलांनी केवायसी न केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महिलांची तारांबळ उडाली आहे. दरम्यान, आता केवायसी करताना महिलांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहेत.

ईकेवायसीसाठी उरले शेवटचे दोन दिवस (Ladki Bahin Yojane eKYC Deadline)

ईकेवायसीसाठी दोन दिवस शिल्लक असतानाच महिलांच्या अडचणीत वाढ झाली आहे. योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर ई केवायसी होत नसल्याने महिला अडचणीत आल्या आहेत.ईकेवायसीसाठी आधार नंबर टाकल्यानंतर हा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीत नाही असल्याच्या मेसेज येत आहे. त्यामुळे पुढील प्रोसेस होत नाही.

ओटीपी येत नसल्याने केवायसी करण्यास अडचणी (Ladki Bahin Yojana eKYC Mistakes)

दरम्यान, दुसरीकडे आधार नंबर टाकून ओटीपी मोबाईल क्रमांकावर येत नसल्याने इ ईकेवायसी करण्यास अडचण येत आहे. लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर तांत्रिक अडचणींचा महिलांना फटका बसत आहे. त्यामुळे महिलांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लाडकी बहीण योजनेत ईकेवायसी केल्याशिवाय महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये. त्यामुळे महिलांना केवायसी करावीच लागणार आहे. यासाठी शेवटचे काही तास उरले आहेत. त्यामुळे महिलांनी आता वेबसाइटवर जाऊन केवायसी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, केवायसी होत नाहीये, अशा तक्रारी येत आहे. त्यामुळे लवकरात लवकर या अडचणींवर मार्ग काढण्याची मागणी महिलांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope: संपत्तीत वाढ होणार! ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

काँग्रेस नेत्यावर गोळीबार; 6-7 गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोलारांनी काढला पळ

Maharashtra News Live Update: शिवसेनेकडून आमदार बच्चू कडू यांच्याकडे मोठी जबाबदारी

Weight Loss: वजन वाढलयं तरी योगा किंवा एक्सरसाईज करायला आळसपणा करताय? मग होऊ शकतात हे गंभीर त्रास

Karjat Tourism : धुक्याच्या सरींमध्ये हरवलेले हिल स्टेशन, कर्जतजवळील 'हे' ठिकाण सुंदर वीकेंड डेस्टिनेशन

SCROLL FOR NEXT