Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: ईकेवायसी करताना झालेली चूक दुरुस्त करायचीये? लाडक्या बहिणींनो ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करा

Ladki Bahin Yojana eKYC Step by Step Process: लाडकी बहीण योजनेत ईकेवायसी करताना चुकी झाली असेल तर तो सुधारण्याचा पर्याय तुमच्याकडे आहे. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने केवायसी करु शकतात.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेत केवायसीत चुका

केवायसीतील चुका दुरुस्त करण्याची शेवटचीसंधी

ऑनलाइन पद्धतीने करु शकतात केवायसी

महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता ज्या महिलांची ईकेवायसी करताना चुकी झाली आहे त्यांना ती दुरुस्ती करता येणार आहे. अनेक महिलांना केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडला आहे. प्रश्न नीट समजला नसल्याने त्यांनी चुकीचा पर्याय निवडला आहे. या महिला पुन्हा केवायसी करु शकतात.

लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख ३१ मार्च २०२६ आहे. त्यानंतर तुम्ही केवायसीमध्ये दुरुस्ती करु शकत नाही. यामुळे ही तुमच्यासाठी शेवटची संधी आहे. केवायसी करण्याची प्रक्रिया महिला व बालविकास विभागाच्या लाडकी बहीण या पोर्टलवर सुरु आहे.

ईकेवायसी दुरुस्तीसाठी स्टेप बाय स्टेप प्रोसेस (Ladki Bahin Yojana eKYC Step By Step Process)

सर्वात आधी तुम्हाला https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जावे.

यानंतर ईकेवायसीची संधी त्या लाभार्थ्यांचे ज्यांनी चुकीचे पर्याय निवडले आहेत, असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लित करा.

यानंतर आधार नंबर टाकावा. कॅप्चा कोड सबमिट करा.

यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. तो टाकावा.

यानंतर अर्जात ज्या ठिकाणी चूक झाली आहे. त्यामध्ये माहिती भरा.

कुटुंबातील अटी आणि शर्ती वाचून चेकबॉक्सवर क्लिक करा.

यानंतर फायनल सबमिट बटनवर क्लिक करा. यानंतर तुमची केवायसी पूर्ण झाली असा मेसेज तुम्हाला येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

क्रिती सेनन कपड्यांवरून ट्रोल; राहुल गांधींची सडेतोड प्रतिक्रिया

Raksha Bandhan: रक्षाबंधनाला भावाला चुकूनही 'या' रंगांच्या राखी बांधू नका, नाही तर...

Maharashtra News Live Update: अहेरीतील आरोग्य, आदिवासी विकासकामांना गती द्या; जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना

साखर महागली, ग्राहकांची पळापळ; बाजारात प्रतिव्यक्ती 1 किलोच साखर

TET Exam: आनंदाची बातमी! शिक्षकांची TET परीक्षेतून सुटका; विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT