Ladki Bahin Yojana eKYC Saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana eKYC: चूक दुरूस्त करण्याची शेवटची संधी, लाडकींनो आताच करा हे काम, अन्यथा ₹१५०० विसरा

Ladki Bahin Yojana eKYC Step By Step Process: लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थ्यांकडून ईकेवायसीमध्ये चुक झाली आहे त्यांनी पुन्हा केवायसी करायची आहे. यासाठीची स्टेप बाय स्टेप प्रोसेस वाचा.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

ईकेवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची शेवटची संधी

ईकेवायसी कशी करायची? वाचा प्रोसेस

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ईकेवायसी करणे अनिवार्य आहे. जर ईकेवायसी केली नाही तर महिलांना हप्ता मिळणार नाही. ईकेवायसी करण्याची शेवटची तारीख उलटून गेली आहे.त्यानंतर कोणालाच नव्याने ईकेवायसी करण्यास मिळणार नाहीये. मात्र, ईकेवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची संधी मात्र महिलांना मिळणार आहे. त्यामुळे ज्या महिलांनी ईकेवायसीमध्ये काही चुकीची माहिती दिली असेल तर ती दुरुस्त करण्याची संधी आहे.

ईकेवायसी दुरुस्तीसाठी शेवटची संधी

लाडकी बहीण योजनेत ईकेवायसी करताना महिलांच्या चुका झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचा लाभ बंद झाला आहे. प्रश्न व्यवस्थित न समजल्याने महिलांनी चुकीची उत्तरे दिली होती. मात्र, आता या चुका सुधारण्याची संधी महिला व बालविकास विभागाने दिली आहे. महिलांनी केवायसीमध्ये ऑनलाइन पद्धतीने दुरुस्ती करायची आहे.

या तारखेपर्यंत करता येणार केवायसी (Ladki Bahin Yojana eKYC Deadline)

लाडकी बहीण योजनेत ईकेवायसी करण्याची संधी ३१ डिसेंबर होती. त्यानंतर नव्याने केवायसी बंद झाली आहे. मात्र, दुरुस्तीसाठी एक संधी दिली आहे. तुम्हाला ३१ मार्चपर्यंत केवायसीमध्ये दुरुस्ती करता येणार आहे. त्यामुळे पुढच्या २० दिवसांमध्ये तुम्हाला केवायसी करायची आहे. जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.

ईकेवायसीत दुरुस्ती कशी करायची? (Ladki Bahin Yojana eKYC Step by Step Process)

सर्वात आधी तुम्हाला https://ladakibahin.maharashtra.gov.in/वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर ज्या लाभार्थ्यांकडून ईकेवायसीमध्ये चुकीचे पर्याय निवडण्यात आले आहेत, यावर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे विचारली जाणार आहे. या प्रश्नांची योग्य उत्तरे द्यायची आहेत.

तुमची केवायसी झाल्यानंतर मेसेज येईल. यानंतर तुमचा लाभ पुन्हा सुरु होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT