Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर-जानेवारीचे ₹३००० एकत्र येणार, तारीख आली समोर, वाचा लेटेस्ट अपडेट

Ladki Bahin Yojana December-January 3000 Rupees Installment: लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर-जानेवारीचा हप्ता एकत्र दिला जाणार आहे. महिलांच्या खात्यात १४ जानेवारीपूर्वी ३००० रुपये दिले जाताील.

Siddhi Hande

लाडकीला डिसेंबर-जानेवारीचा हप्ता एकत्र येणार

मकरसंक्रांतीपूर्वी महिलांना मिळणार ३००० रुपये

महापालिका निवडणूकीपूर्वी महिलांना खुशखबर मिळणार

डिसेंबर महिना उलटून गेला आता जानेवारीचाही पहिला आठवडा संपत आला. दरम्यान, अजूनही महिलांच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा झाला नाही. मागच्या आठड्यात नोव्हेंबरचे पैसे जमा केले. त्यानंतर आता डिसेंबर- जानेवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. याचसोबत दोन्ही हप्ते एकत्र येणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

मकरसंक्रांतीपूर्वी लाडकीला मिळणार ३००० रुपये (Ladki Bahin Yojana 3000 Rupees Installment come Before Makarsankrant)

लाडकी बहीण योजनेत डिसेंबर आणि जानेवारीचे ३००० रुपये महिलांना एकत्र मिळणार आहे. १४ जानेवारीपूर्वी हे पैसे जमा केले जातील. १४ जानेवारीला मकरसंक्रांत आहे तर १५ जानेवारीला महापालिकेची निवडणूक आहे. त्यापुर्वी महिलांना दोन हप्ते दिले जातील, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सव्वाकोटी लाडक्या बहि‍णींना हप्ता मिळत आहे. या योजनेअंतर्गत दहा तारखेपर्यंत लाडक्या बहि‍णींना १५०० रुपये मिळतील, असं शासन निर्णयात म्हटलं आहे. त्यामुळे महिलांना या महिन्यात लवकर पैसे येऊ शकता.

१० ते १४ तारखेपर्यंत पैसे दिले जातील (Ladki Bahin Yojana 3000 Rupees Installment come on These Date)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता नुकताच दिली आहे. आता मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकदाच मिळेल. १० ते १४ जानेवारीपर्यंत पैसे दिले जातील, असं किरण जाधव, महिला व बालविकास अधिकारी सोलापूर यांनी दिली.

लाडकी बहीण योजनेत डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकाचवेळी दिला जाणार आहे. यासाठी महिला व बालविकास विभागाने वित्त मंत्रालयाकडे निधीदेखील मागितला असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे महिलांना पुढच्या आठवड्यात पैसे येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आहो सुदामे! रीलस्टार अथर्व सुदामेला PMP कडून तिसरी नोटीस, 50 हजारांचा दंड

मुंबईनंतर पुण्यात तुफान राडा; शिंदे गटाच्या दोन गटाच्या २ उमेदवारांवर हल्ला, वडगाव शेरीत दगडफेक

Nashik Accident: नाशिक-पेठ महामार्गावर भीषण अपघात; दोन्ही कारचा चुराडा, ४ जणांचा जागीच मृत्यू, ६ गंभीर जखमी

Thursday Horoscope : स्वभावातला हेकेखोरपणा सोडा, नाहीतर...; ५ राशींच्या लोकांनी राहा सावधान

भाजपचा सत्तेसाठी अकोट पॅटर्न? विचारधारेला तिलांजली; AIMIM शी घरोबा, राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT