Ladki Bahin Yojana: 'देवाभाऊ' मुख्यमंत्री असेपर्यंत योजना राहणार चालू; अकोल्यात फडणवीसांची 'लाडक्या बहिणीं'ना साद

Devendra Fadnavis Comment On Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना सुरूच राहील. जोपर्यंत आपण मुख्यमंत्री आहोत तोपर्यंत कोणीही ही योजना बंद करू शकत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यात पुन्हा ग्वाही दिली.
Devendra Fadnavis Comment On Ladki Bahin Yojana
CM Devendra Fadnavis addressing a rally in Akola, assuring continuation of the Ladki Bahin Yojana.saam tv
Published On
Summary
  • अकोल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

  • लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असा पुनरुच्चार

  • भाजप–राष्ट्रवादी युतीच्या प्रचार सभेत वक्तव्य

अक्षय गवळी, साम प्रतिनिधी

अकोल्यात आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाडक्या बहिणींना साद घातलीय. आपण मुख्यमंत्री असेपर्यंत कुणीही 'लाडकी बहीण योजना' बंद करू शकणार नसल्याचा पुनूरूच्चार त्यांनी केलाय.‌ आज देवेंद्र फडणवीस अकोल्यात भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या युतीच्या प्रचार सभेला आले होतेय. अकोल्यातील क्रिकेट क्लब मैदानावर त्यांची सभा झाली. यावेळी त्यांनी लाडकी बहिणी योजना आणि छोट्या महापालिकांबाबत मोठं विधान केलं.

राज्य सरकारची महत्त्वकांक्षी योजना लाडकी बहीण योजनेवरून विरोधक सरकारवर टीका करतात. सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत, लवकरच ही योजना बंद होणार असा दावा विरोधकांकडून केला जातो. त्यावर आज मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा ग्वाही देत महिलांना आश्वसत केलं.

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील लहान महापालिकांबाबत मोठी घोषणा केलीय. यापुढे राज्य सरकारच्या विकास योजनांमधील लहान महापालिकांचा ३० टक्के वाटा राज्य सरकार भरेल, असं त्यांनी जाहीर सभेत जाहीर केल. त्यामुळे अनेक विकास योजनांमध्ये आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे विकास वाटा भरू न शकणाऱ्या महापालिकांचा यामध्ये फायदा होणार आहे.

Devendra Fadnavis Comment On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मिळालं नववर्षाचं गिफ्ट; लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात

महाराष्ट्र देशातील दुसऱ्या क्रमांकाचं नागरीकरण झालेले राज्य आहे. शहरी भागातील राहणाऱ्या लोकांच्या जीवनावर परिणाम करणारी ही निवडणूक आहे. आधीच्या राज्यकर्त्यांनी शहरांकडे दुर्लक्ष केल्याने आजही नागरी सुविधांची उणिवा जाणवत आहेत. दरम्यान २०१४ मध्ये मोदींचं सरकार आल्यापासून बदल सुरू झालाय. मोदींनी शहरांसाठी योजना सुरू केल्या. शहरांना करोडो रुपये देत नव नव्या योजना आणल्या.

Devendra Fadnavis Comment On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin eKYC: थर्टी फर्स्टची डेडलाईन तरी ई-केवायसी सुविधा सुरूच; लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक घोळ?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com