Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: नवीन वर्षात लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट! मकरसंक्रांतीला खात्यात ₹३००० येणार? वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana December-January 3000 Rupees come on Makar Sankranti: लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर-जानेवारीचा हप्ता एकत्र येऊ शकतात. मकरसंक्रांतीचा मूहूर्त साधत महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा केले जाऊ शकतात.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती

डिसेंबर-जानेवारीचा हप्ता एकत्र येणार?

मकरसंक्रांतीला खात्यात येऊ शकतात ३००० रुपये

लाडकी बहीण योजनेत महिलांना नोव्हेंबरचा हप्ता देण्यात आला आहे. नोव्हेंबरच्या हप्त्यानंतर आता महिला डिसेंबरच्या हप्त्याची प्रतिक्षा करत आहे. दरम्यान, अशातच आता जानेवारीचा हप्ता कधी दिला जाणार याबाबतदेखील चर्चा होत आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, महिलांच्या खात्यात फक्त नोव्हेंबरचे १५०० रुपये जमा झाले.

डिसेंबर-जानेवारीचा हप्ता एकत्र येणार? (Ladki Bahin Yojana December-January Installment May Come Together)

नोव्हेंबरचे पैसे जमा झाले आहेत. यानंतर डिसेंबर-जानेवारीचा हप्ता एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, डिसेंबर-जानेवारीचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे. १४ जानेवारीला महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात. मकरसंक्रांतीचा मूहूर्त साधत महिलांना खुशखबर दिली जाऊ शकते.

महापालिका निवडणूकीआधी महिलांना मिळणार पैसे (Ladki Bahin Yojana 3000 Rupees Come on Makar Sankranti)

मकरसंक्रांतीसोबतच महापालिका निवडणूकीआधी महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात. महापालिका निवडणुका या १४-१५ जानेवारी रोजी होणार आहेत. त्याआधी महिलांना पैसे दिले जाऊ शकतात. त्यामुळे महिलांना डबल आनंद मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

या महिलांना लाभ होणार बंद

लाडकी बहीण योजनेतून काही महिलांचा लाभ बंद होणार आहे. ज्या महिलांनी केवायसी केले नाही त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. केवायसी करण्याची मुदत संपली आहे. त्यामुळे आता उरलेल्या महिलांना पैसे मिळणार नाही. अजूनही लाखो महिलांनी केवायसी न केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या महिलांना प्रत्येक महिन्याला हप्ता मिळणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: फैजपूर येथे भीषण अपघात; एक गाडी पुलावरून खाली कोसळली

Pune : मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या मुलावर गुन्हा दाखल, मध्यरात्री हायव्होल्टेज ड्रामा, भाजपकडून तक्रार अन्....

Farmer Stamp Duty Waiver : शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! २ लाखांपर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ; नेमकी काय आहे योजना? वाचा

Prayagraj Magh Mela 2026: प्रयागराजचा मेळा आजपासून सुरु! आत्ताच नोट करा विशेष स्नानाची तारीख

BHEL Recruitment: भारत सरकारच्या कंपनीत नोकरीची संधी; पगार ९५,००० रुपये; आजच अर्ज करा

SCROLL FOR NEXT