Maharashtra Politics: पिंपरीत एबी फॉर्मवरून गोंधळ, २ पक्षांचा एक उमेदवार, निवडणूक अधिकारी बुचकळ्यात

Pimpri -Chinchwad Civic Polls: पिंपरी- चिंचवडमध्ये महापालिका निवडणुकीदरम्यान एबी फॉर्मवरून गोंधळ निर्माण झाला. २ पक्षांचा एकच उमेदवार असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचे टेन्शन वाढलं.
Maharashtra Politics: पिंपरीत एबी फॉर्मवरून गोंधळ, २ पक्षांचा एक उमेदवार, निवडणूक अधिकारी बुचकळ्यात
Maharashtra PoliticsSaam tv
Published On

Summary -

  • पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत अनोखा गोंधळ

  • दोन उमेदवारांनी दोन पक्षांचे एबी फॉर्म भरते

  • अर्ज छाननीत दोन्ही उमेदवारी एबी फॉर्म ठरले वैध

  • निवडणूक अधिकारी आणि आयोगासमोर तांत्रिक पेच

गोपाळ मोटघरे, पिंपरी-चिंचवड

महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत एकीकडे इच्छुक उमेदवारांची एबी फॉर्म मिळवण्यासाठी दमछाक झाली. काहींना एबी फॉर्म न मिळाल्यामुळे नाराजीनाट्य पहायला मिळाले. पण पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत जरा वेगळच चित्र पाहायला मिळाले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी अर्ज छाननीनंतर एक खळबळजनक बाब समोर आली. प्रभाग क्रमांक २० 'ब' आणि ३० 'अ' मध्ये दोन उमेदवारांनी चक्क दोन-दोन राजकीय पक्षांचे 'एबी' फॉर्म जोडून अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे छाननीमध्ये हे दोन्ही अर्ज वैध ठरल्याने आता या उमेदवारांसमोर आणि निवडणूक आयोगासमोर मोठा तांत्रिक पेच निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक २० 'ब' मधून नीलम म्हात्रे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट अशा दोन्ही पक्षांचे एबी फॉर्म जोडले आहेत. दुसरीकडे, प्रभाग क्रमांक ३० 'अ' मधून संदीप गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट या दोन परस्परविरोधी युतींमधील पक्षांचे एबी फॉर्म दाखल केले आहेत. तसं पाहायला गेलं तर उमेदवाराने कोणत्याही एकाच पक्षाचा एबी फॉर्म जोडून उमेदवारी निश्चित करणे अपेक्षित होते. मात्र, या दोघांनीही दोन्ही पक्षांचे फॉर्म सादर केल्याने ते सध्या कागदोपत्री दोन्ही पक्षांचे उमेदवार म्हणून दिसत आहेत.

Maharashtra Politics: पिंपरीत एबी फॉर्मवरून गोंधळ, २ पक्षांचा एक उमेदवार, निवडणूक अधिकारी बुचकळ्यात
Ahilyanagar Politics: ऐन निवडणुकीत मनसेचे २ उमेदवार गायब; अहिल्यानगरमध्ये खळबळ

आज २ जानेवारी हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत या दोन्ही उमेदवारांकडे एका पक्षाची उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा पर्याय शिल्लक आहे. जर त्यांनी स्वतःहून एका पक्षाची निवड केली नाही, तर निवडणूक आयोग आपल्या नियमानुसार पुढील कार्यवाही करणार आहे. जर या दोन्ही उमेदवारांनी दुपारी ३ वाजेपर्यंत निर्णय घेतला नाही तर निवडणूक आयोग या पेचावर अंतिम निकाल लावेल.

Maharashtra Politics: पिंपरीत एबी फॉर्मवरून गोंधळ, २ पक्षांचा एक उमेदवार, निवडणूक अधिकारी बुचकळ्यात
Maharashtra Politics: ऐननिवडणुकीत राज ठाकरेंना शिवसेनेचा 'दे धक्का', अंधेरीत मनसेला भलं मोठं खिंडार

नियमानुसार, संबंधित उमेदवाराने ज्या पक्षाचा अर्ज आणि 'एबी' फॉर्म सर्वात आधी वेळेनुसार प्रथम दाखल केला असेल त्याच पक्षाची उमेदवारी ग्राह्य धरली जाईल. दुसऱ्या पक्षाचा अर्ज आपोआप बाद ठरवला जाईल. त्यानंतर उमेदवारांकडे कोणताही पर्याय शिल्लक राहणार नाही. त्यामुळे आता नीलम म्हात्रे आणि संदीप गायकवाड हे आता नक्की कोणत्या पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून ग्राह्य धरले जातात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Maharashtra Politics: पिंपरीत एबी फॉर्मवरून गोंधळ, २ पक्षांचा एक उमेदवार, निवडणूक अधिकारी बुचकळ्यात
Maharashtra Politics: तिकीटासाठी अशोक चव्हाणांनी ५०-५० लाख घेतले, भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com