Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार? आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

Ladki Bahin Yojana August Installment Update: लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता कधी येणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आता याबाबत आदिती तटकरेंनी सांगितलं आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट

लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्त लवकरच येणार

आदिती तटकरेंनी दिली माहिती

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याबाबत स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता ललकरच दिला जाईल, असं त्यांनी सांगितलं.

लाडकीच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट (Ladki Bahin Yojana Installment Update)

लाडकी बहीण योजनेत अजून ऑगस्टचा हप्ता दिलेला नाही. सप्टेंबर महिना सुरु झाला असला तरीही अद्याप ऑगस्टचेच पैसे महिलांना मिळाले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान याबाबत लवकरच माहिती दिली जाईल,असं सांगितलं जात आहे. सप्टेंबर महिना सुरु होऊन ५ दिवस झाले आहेत. तरीही अजून पैसे जमा झालेले नाहीत. यामुळे सप्टेंबर आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. दरम्यान, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

ऑगस्टचा हप्ता लवकरच येणार,आदिती तटकरेंची माहिती

काल महिला व बालविकास मंत्री यांनी साम टीव्हीशी बोलताना ऑगस्टच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. 'लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता लवकरच दिला जाईल. लाडकी बहीण योजना अशीच यशस्वीरित्या सुरु ठेवण्याचा महायुती सरकारचा संकल्प आहे'. असं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता कधी येणार याकडे सर्व लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup: बांगलादेश आऊट! टी-२० विश्वचषकात खेळण्यास नकार

बदलापुरात ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, स्कूल व्हॅन फोडण्याचा प्रयत्न

महाराष्ट्रातील कोणत्या शहरात किती कोटींची गुंतवणूक आली? मुख्यमंत्र्यांनी सांगितला आकडा

Friday Horoscope : जुन्या कर्जापासून मुक्त होणार, प्रेमात यश मिळणार;५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

पुणे ग्रँड टूरमध्ये अप्पांची धडाकेबाज एन्ट्री; वय ७०, जोश मात्र तरुणाला ही लाजवेल असा

SCROLL FOR NEXT