Ladki Bahin Yojana Update Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये जमा, पैसे आले की नाही कसे चेक कराल?

Ladki Bahin Yojana August InstallmentUpdate: लाडक्या बहिणी ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार याची वाट पाहत होत्या. त्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. त्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरूवात झाली.

Priya More
  • लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींसाठी आनंदाची बातमी

  • ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये खात्यात जमा होण्यास सुरूवात

  • सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत महत्वाची माहिती समोर आली नाही

  • लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झाले की नाही हे आताच तपासा

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरूवात झाली आहे. राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये वितरीत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. येत्या २ ते ३ दिवसांत लाडकींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आपल्या खात्यावर ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये जमा झाले की नाही हे लाडक्या बहिणींनी कसे चेक करायचे हे आपण जाणून घेणार आहोत...

लाडक्या बहिणी योजनेतील लाभार्थी महिला गेल्या अनेक दिवसांपासून १५०० रुपये कधी मिळणार याची वाट पाहत आहेत. नेहमीप्रमाणे सरकार सणासुधीचे औचित्य साधत यंदा देखील गणेशोत्सवात लाडकींना हे पैसे देतील अशी शक्यता वर्तवली जात होती. गणेशोत्सव संपला तरी लाडकींच्या खात्यातवर पैसे न आल्यामुळे त्या नाराज झाल्या होत्या. पण आता येत्या दोन ते तीन दिवसांत लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये जमा होतील.

महत्वाचे म्हणजे, 'मंत्री संजय शिरसाट यांनी देखील लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट दिली होती. ते म्हणाले होते की, 'सामाजिक न्याय विभागाने आवश्यक निधीची व्यवस्था करून ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी ३३९ कोटी रुपये वितरित केले आहेत. आता शासन निर्णय झाल्याने आणि निधि वितरित झाल्यामुळे लाडक्या बहिणींच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम लवकरच जमा केली जाण्याची शक्यता आहे.

खात्यात पैसे आले की नाही? असं करा चेक

- तुम्ही तुमच्या बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करून तुमच्या बँक अकाऊंटमध्ये जमा झालेली रक्कम विचारू शकता.

- ऑनलाईन बँकिंग किंवा बँकेच्या अॅपच्या माध्यमातून बँक स्टेटमेंट डाऊनलोड करा. याद्वारे तुम्हाला तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत की नाही? हे समजेल.

- तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले असतील तर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर तुम्हाला मेसेज देखील येईल. हा मेसेज आला तर तुम्हाला पैसे जमा झाले हे समजेल.

- ऑनलाईन बँकिंग वापरत नसाल तर प्रत्यक्ष तुम्ही बँकेत जाऊन लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत की नाही याची विचारपूस करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips : रागाच्या भरात या गोष्टी बोललात, तर नातं संपायला वेळ लागणार नाही

Same Food Side Effect: तुम्हीही रोज एकच नाश्ता किंवा जेवण करता का? वाचा काय घडते तुमच्या शरीरात!

Shocking : नूडल्स खाऊन झोपले, सकाळी उठलेच नाहीत, एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू; नेमकं काय घडलं ?

Maharashtra News Live Update: नंदुरबार बाजार समितीत कापूस खरेदीला सुरुवात

Pune News: पुण्यात राष्ट्रवादीच्या २ बड्या नेत्यांविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT