Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींंच्या ऑगस्ट हप्त्याचा GR आला! ₹1,500 की ₹3,000 मिळणार? वाचा...

Ladki Bahin Yojana GR Released : लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ऑगस्ट २०२६ हप्त्यासाठी निधी वितरणाला मंजुरू मिळाली आहे.
Ladki Bahin Yojana GR Released
Ladki Bahin Yojana GR Releasedmeta ai
Published On: 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी अत्यंत आनंदाची माहिती समोर आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२६ महिन्याच्या आर्थिक लाभासाठी निधी वितरणाला शासनाची मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे ऑगस्टचा रखडलेला हप्ता मिळण्याच्या प्रक्रियेला आता गती मिळण्याची शक्यता आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुसूचित जाती घटकांतर्गत पात्र लाभार्थी महिलांसाठी ₹३३९.१४ कोटींचा निधी वितरिक करण्यात आलेला आहे. हा निधी ऑगस्ट २०२६ च्या आर्थिक लाभासाठी असल्याचं GR मध्ये नमूद करण्यात आलं आहे.

Ladki Bahin Yojana GR Released
Ladki Bahin Yojana : सप्टेंबर महिना संपत आला, ऑगस्टचा हफ्ता कधी जमा होणार? लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट

मात्र, या GR नंतर महिलांमध्ये चर्चेत असलेल्या ₹३००० हप्त्याबाबत महत्त्वाची स्पष्टता समोर आली आहे. GR मध्ये प्रत्येक लाभार्थी महिलेच्या खात्यात ३००० रुपये जमा केले जातील, असं स्पष्टपणे नमूद केलेलं नाही. त्यामुळे फक्त या शासन निर्णयाच्या आधारे प्रत्येक महिलेला ३००० रुपये मिळणार असल्याचा निष्कर्ष काढता येत नाही.

Ladki Bahin Yojana GR Released
Banking News : मोठा निर्णय! या रविवारी बँका सुरू राहणार, ग्राहकांना दिलासा

GR मध्ये ३००० कोटींच्या ठराविक खर्चाचा उल्लेख आहे. मात्र ही रक्कम प्रत्येक लाभार्थी महिलेला मिळणारा हप्ता नसून, संपूर्ण आर्थिक वर्षासाठीची अर्थसंकल्पीय तरतूद आहे. त्यामुळे ३००० कोटी आणि प्रत्येक महिलेला मिळणारे ३००० रुपये यामध्ये फरक आहे.

योजनेतल्या नियमित मासिक लाभ १,५०० असल्याच्या पार्श्वभूमीवर ऑगस्टच्या हप्त्याबाबत महिलांची उत्सुकता वाढली आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार GR मध्ये वैयक्तिक लाभार्थींच्या खात्यात जमा होणारी अंतिम रक्कम स्वतंत्रपणे स्पष्ट करण्यात आलेली नाही. GR नुसार मंजूर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यात आला आहे.

त्यामुळे सध्या एवढे स्पष्ट आहे की ऑगस्ट २०२६ च्या हप्त्यासाठी निधी मंजूर झाला आहे. मात्र ३००० रुपयांचा हप्ता मिळणार असल्याची अधिकृत पुष्टी या GR मधून होत नाही. अंतिम जमा रक्कम आणि पैसे खात्यात येण्याची तारीख अधिकृत माहिनीनंतरच निश्चित मानावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com