Mukhyamantri Ladki Bahin Yojana Saam TV
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो, आता तुमचे पैसे येणार नाहीत, काय आहे कारण? वाचा...

Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजनेला सध्या तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. आचारसंहिता लागल्यामुळे या योजनेचा निधी वितरण न करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत. मात्र, आता आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार नाही. पुढच्या महिन्यापर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या हप्त्यासाठी महिलांना वाट पाहावी लागणार आहे. (Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर होती. त्यामुळे आता तुम्हाला महिलांना योजनेत अर्ज करता येणार नाही. दरम्यान,सध्या आचारसंहिता लागू झाल्यामुळे योजनांचे पैसेदेखील जमा केले जाणार नाहीत. आचारसंहितेच्या काळात मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या योजना बंद कराव्यात, अशा सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानंतर महिला आणि बालकल्याण विभागाकडून योजनेसाठी निधी थांबवला आहे.

निवडणुका होईपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांना मिळणार नाही. त्यामुळे आता महिलांना पुढच्या हप्त्यासाठी डिसेंबर महिन्याची वाट पाहावी लागणार आहे.सध्या लाडकी बहीण योजनेला तात्पुरती स्थिती मिळाली आहे. (Ladki Bahin Yojana Latest Update)

योजनेला स्थगिती देण्याचे कारण काय?

निवडणूक आयोगाने मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या योजना त्वरीत थांबवल्या पाहिजेत,अशा सूचना दिल्या आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे. त्यामुळे या योजनेच्या निधीचे वितरण थांबवण्यास सांगितले आहे. आचारसंहितेमुळे या योजनेला तात्पुरती स्थगिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Instagram Award Function: इन्स्टाग्राम युजर्सला खुशखबर! टॉप क्रिएटर्सना मिळणार स्पेशल गिफ्ट, वाचा सविस्तर

Pandharpur : अखेर निराधार वृध्द महिलेला मिळालं हक्काचं घर; घर उभारण्यासाठी नृत्यांगना सायली पाटील यांच्या पुढाकार

Maharashtra Live News Update : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याला बेड्या, नेमकं प्रकरण काय?

बापाने पोटच्या २ चिमुकल्यांचा घेतला जीव, नंतर स्वत:ही आयुष्य संपवलं; धक्क्दायक कारण समोर

Diwali Ubtan Recipe : दिवाळीला घरीच बनवा सुगंधी उटणे, टॅनिंग होईल दूर अन् चेहऱ्यावर येईल इन्स्टंट ग्लो

SCROLL FOR NEXT