Saam TV Impact : साम टीव्हीच्या बातमीचा दणका; महिला बालकल्याण विभागाकडून कारवाई सुरु

Pune Zilla Parishad News : दोन तासांत साम टीव्हीच्या बातमीची दखल सरकारने घेतली. महिला बालकल्याण विभागाने दखल घेत जिल्ह्यात पुरवठा होणाऱ्या मालाची तातडीने तपासणी सुरु केली आहे.
Saam tv Impact : साम टीव्हीच्या बातमीची सरकारकडून दखल; महिला बालकल्याण विभागाकडून कारवाई सुरु
Saam tv Impact :Saam tv

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून गरोदर मातांना निकृष्ट दर्जाचा शिधा पुरवठा केला जात होता. हा धक्कादायक प्रकार साम टीव्हीने समोर आणला. साम टीव्हीने प्रथम पुणे जिल्हा परिषदेचा हा गलथान कारभार समोर आणला. त्यानंतर दोन तासांत साम टीव्हीच्या बातमीची दखल सरकारने घेतली. महिला बालकल्याण विभागाने दखल घेत जिल्ह्यात पुरवठा होणाऱ्या मालाची तातडीने तपासणी सुरु केली आहे.

गरोदर मातांना दिल्या जाणाऱ्या शिधा निकृष्ट दर्जाचा पुरवठा करण्यात आला. साम टीव्हीने या प्रकाराचं सत्य समोर आणले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाकडून गांभीर्याने दखल घेतली. त्यानंतर जिल्ह्यात पुरवठा करण्यात आलेल्या मालाची तातडीने तपासणी सुरु केली आहे. या आहाराचा पुरवठा केल्यानंतर संबंधित पुरवठाधारकाने पुरवठा केलेल्या साहित्यापैकी एक सॅम्पल NABL लॅबकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

Saam tv Impact : साम टीव्हीच्या बातमीची सरकारकडून दखल; महिला बालकल्याण विभागाकडून कारवाई सुरु
Shirur Latest News : आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा; गरोदर मातेच्या पोषण आहारात आढळली कीड

अमोल कोल्हे काय म्हणाले?

पुणे जिल्हा परिषदेच्या कारभारावर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले, 'पुणे जिल्हा परिषदेचे महिला आणि बालकल्याण विभागामार्फत गरोदर महिला आणि बाळ्याच्या आरोग्यासाठी पुरविण्यात येणारे पोषण आहार निष्कृष्ट दर्जाचं होत असेल तर ही गंभीर बाब आहे. या पोषण आहारातून माता आणि बाळाचे पोषण होण्याऐवजी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचे पोषण होत होतेय का, याची दक्षता पालकमंत्री अजित पवार यांनी घ्यावी, अशी विनंती अमोल कोल्हे यांनी केली.

Saam tv Impact : साम टीव्हीच्या बातमीची सरकारकडून दखल; महिला बालकल्याण विभागाकडून कारवाई सुरु
Pune Health Department: गर्भवतींच्या जीवाशी खेळ, पोषण आहारात अळ्या; 'साम'च्या बातमीनंतर सरकार खडबडून जागं, चौकशीचे आदेश

सुषमा अंधारे काय म्हणाल्या?

पुणे जिल्हा परिषदेच्या कारभारावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे. 'पोषण आहाराच्या नावखाली अंगणवाडीमध्ये अचानक छापेमारी केल्यास निकृष्ट आणि आजारी पडाल असा माल आढळून येईल. या आहारात सोनकिडे आणि अळ्या आढळणे ही नवीन बाब नाही. शिरूरमधील घटनेचे पुरावे आढळून आले तरी त्याच्यावर कारवाई होत नाही. सरकारला गरोदर महिलांच्या प्रश्नांशी देणेघेणे नाही. निवडणूक, जागावाटप यामध्ये ही सर्व गुंतली आहेत.

'आरोग्य यंत्रणेचा कारभार खिळखिळा झाला आहे. या योजनेचा नाव पोषण आहार आहे. मात्र, पोषक घटक नाही. कुठल्याही अंगणवाडीत खिचडी की रवा असतो हे काही कळत नाही,अशी टीका अंधारे यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com