Pune Health Department: गर्भवतींच्या जीवाशी खेळ, पोषण आहारात अळ्या; 'साम'च्या बातमीनंतर सरकार खडबडून जागं, चौकशीचे आदेश

Shirur Latest News in marathi : पुणे जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आलीय. पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातून गरोदर महिलेला दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात अळ्या आणि सोनकीडे आढळून आल्याची बातमी सर्वप्रथम साम टीव्हीने दाखवल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
Worms found in diet food of pregnant womens
Worms found in diet food of pregnant womens Saam Tv

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातून गरोदर महिलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात अळ्या आणि सोनकीडे आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणाची बातमी सर्वप्रथम साम टीव्हीने दिल्यानंतर प्रशासन खडबडून झाले आहे. दरम्यान प्रकरणानंतर विरोधकांकडून सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. तर महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेत. (Latest News)

गरोदर महिलांच्या आहारात किडे आढळल्यामुळे आरोग्य महिलांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान साम टीव्हीने याप्रकरणाची बातमी दिल्यानंतर प्रशासन जागे झाले असून सखोल चौकशी केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देत या घटनेची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल, असं म्हटलंय.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील शिरूर तालुक्यातील आंबळे गावातून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आंबळे गावातील आरोग्य विभागात गरोदर असणाऱ्या महिलांना उत्तम प्रकारची शक्ती मिळावी, यासाठी शासनाचा पोषक आहार म्हणून किट देण्यात येते. मात्र या किटमध्ये बदाम, खारीक,काजू , गूळ आणि इतर पोषण आहाराचा समावेश आहे. या आहारातील गुळ आणि काजूमध्ये किडे आढळले आहे. गरोदर महिलांना निकृष्ट दर्जाचा आहार दिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणाची बातमी साम टीव्हीने दिल्यानंतर प्रशासन जागे झाले असून कारवाईचे आदेश दिलेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com