Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणींना विचारणार हे ५ प्रश्न; पडताळणीला सुरुवात, तुमचं नाव तर नाही ना?

Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे. लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी सेविका महिलांना काही प्रश्न विचारणार आहे. त्यानंतर महिलांची छाननी होणार आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची होणार पडताळणी

अंगणवाडी सेविका करणार छाननी

अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणींना विचारणार हे ५ प्रश्न

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना जुलैचा हप्ता देण्यात आला आहे. यानंतर लवकरच ऑगस्टचेही पैसे दिले जातील. परंतु जवळपास ४२ लाख महिलांना जुलैचा हप्ता मिळालेला नाही. या योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. लाडक्या बहि‍णींच्या अर्जांची पडताळणी सुरु आहे.

अंगणवाडी सेविकांकडून होणार पडताळणी (Ladki Bahin Yojana Re Verification)

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी अंगणवाडी सेविकांकडून होणार आहे. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन महिलांच्या अर्जांची छाननी करणार आहे. दरम्यान, महिला लाडक्या बहि‍णींच्या घरी जाऊन त्यांना प्रश्न विचारणार आहे. त्यानंतर त्यांच्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे.

अंगणवाडी सेविका लाडक्या बहि‍णींना काय प्रश्न विचारणार?

लाडकी बहीण योजनेतून ज्या महिलांना अपात्र ठरवल्या आहेत त्यांच्या घरी जाऊन अंगणवाडी सेविका जाऊन चौकशी करणार आहे. अंगणवाडी सेविका लाडक्या बहि‍णींना काही महत्त्वाचे प्रश्न विचारणार आहेत. हे प्रश्न लाडकी बहीण योजनेच्या निकषांशी संबंधित असणार आहे.

महिलांना विचारले जाणारे प्रश्न (What Questions Asked To Ladki Bahin)

  • तुमच्याकडे चारचाकी वाहन आहे का?

  • तुम्ही इन्कम टॅक्स भरता का किंवा तुमच्या घरातील कोणी इन्कम टॅक्स भरतं का?

  • तुमच्या घरातील किती महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे?

  • तुमचे वार्षिक उत्पन्न किती आहे?

  • महाराष्ट्राची रहिवासी असल्याचा पुरावा आहे का? तुमचे वय किती आहे?

लाडकी बहीण योजनेचे निकष (Ladki Bahin Yojana Eligibility Criteria)

जर तुमच्याकडे या प्रश्नांची उत्तरे असतील आणि ही उत्तरे लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बसत असतील तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, जर तुम्ही वयोगटात बसत नसाल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे. महिलांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे. महिला सरकारी कर्मचारी नसाव्यात. त्यांच्या घरातील २ पेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulja Bhawani Temple : गाभाऱ्याच्या पाहणीचा अहवाल राज्य पुरातत्त्व विभागाकडे सुपूर्द; शिखराबाबत लवकरच निर्णय

Congress setback : काँग्रेसला आणखी एक धक्का, ठाकरे भाजपच्या संपर्कात, विदर्भाचे राजकारण फिरणार!

PM Awas Yojana : घरकुलाचं काम झालं, पण पैसे द्यायला सरकारी अधिकाऱ्याची टाळाटाळ, 20 हजार रुपयांची मागितली लाच

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासी आयुक्त कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या १२५ आंदोलकांवर गुन्हा

Tax Refund: कामाची बातमी! आता उशिरा आयटीआर भरला तरीही मिळणार रिफंड; सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT