Ladki Bahin Yojana saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतून ९२ लाख महिलांची नावे वगळली! दुष्काळग्रस्त महिलांचा मुंबईत एल्गार; १,५०० रुपये पुन्हा सुरू करण्याची मागणी

Maharashtra Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून ९२ लाख महिलांची नावं वगळल्याचा दावा करण्यात आला आहे.

Sakshi Sunil Jadhav

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झाल्याने दुष्काळग्रस्त भागातल्या महिलांचा संताप आता रस्त्यावर उतरला आहे. ई-KYC पूर्ण न झाल्यामुळे हजारो महिलांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावं लागत असल्याचा मुद्दा उपस्थित करत महिलांनी मुंबईतल्या आझाद मैदानात आंदोलन केलं. बंद झालेला दरमहा, १,५०० रुपयांचा लाभ पुन्हा सुरू करावा, अशी प्रमुख मागणी आंदोलक महिलांनी केली आहे.

या आंदोलनात दुष्काळाचा फटका बसलेल्या जिल्ह्यांतल्या महिलांनी सहभाग घेतला. आधीच शेती आणि मजुरीची कामं उपलब्ध नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यातच लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद झाल्याने महिलांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. 'आम्हाला फसवल्यासारखं वाटतंय' अशी भावना काही महिलांनी व्यक्त केली.

पालघरमधल्या शेतमजूर तानुजा बारप यांनी दुष्काळामुळे काम मिळणं बंद झाल्याचं सांगितलं. अशा परिस्थितीत योजनेतून मिळणारे १,५०० रुपये कुटुंबासाठी महत्त्वाचं होतं. पण ई-केवायसी मधल्या अडचणींमुळे हा लाभ बंद झाल्याने महिलांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याचं त्यांनी सांगितलं.

आंदोलनादरम्यान समोर आलेल्या आकडेवारीनुसार, तब्बल ९२ लाख महिलांची नावं लाभार्थी यादीतून वगळण्यात आली असून, त्यापैकी ६२ लाख महिलांची ईकेवायसी प्रोसेस अपूर्ण असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे ईकेवायसी प्रोसेसमधल्या अडचणी दूर करून पात्र महिलांना पुन्हा योजनेत सामावून घेण्याची मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, आंदोलक महिलांनी सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्या. ईकेवायसी पूर्ण करण्यासाठी योग्य संधी द्या आणि पात्र लाभार्थी महिलांचे थकीत तसेच बंद झालेले हप्ते परत सुरू करावेत, अशी मागणी केली आहे. आता सरकार या आंदोलनाची दखल घेऊन लाडक्या बहिणींना परत १,५०० रुपयांचा लाभ देण्यासाठी काय निर्णय घेणार, याकडे महिलांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News: महिला आमदाराच्या घरावर ईडीचा छापा, भाजपमध्ये प्रवेश न केल्याने कारवाई केल्याचा आरोप

Pune : पुणे पोलीस दलात खळबळ! आयुक्तांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ घालणारा पोलीस कर्मचारी निलंबित

Maharashtra News Live Update : अभिनेता आयुष्मान खुरानाला धमकीचा ऑडिओ मेसेज; कोट्यवधींच्या खंडणीची मागणी

Kidney Damage : जास्त पाणी प्यायल्यानेही किडनी होते खराब? दिवसातून किती पाणी प्यावे?

Mumbai : मुंबईतील प्रदूषणात पुन्हा वाढ; हवेचा गुणवत्ता AQI १७१ वर

SCROLL FOR NEXT