Kidney Damage : जास्त पाणी प्यायल्यानेही किडनी होते खराब? दिवसातून किती पाणी प्यावे?

Shreya Maskar

किडनी खराब

शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने किडनीचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते. मात्र, गरजेपेक्षा जास्त पाणी पिणेही आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

Kidney failure | pinterest

पाणी पिण्याचा अतिरेक

विशेषतः कमी वेळात खूप जास्त पाणी प्यायल्यास शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी होऊ शकते. या स्थितीला हायपोनेट्रेमिया म्हणतात.

Excessive drinking of water | pinterest

जास्त पाणी प्यायल्याने किडनी होणारा परिणाम

किडनी रक्तातील अतिरिक्त पाणी आणि टाकाऊ पदार्थ गाळून लघवीद्वारे बाहेर टाकते. मात्र, कमी वेळात खूप जास्त पाणी प्यायल्यास किडनीला ते बाहेर टाकणे कठीण होऊ शकते.यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण वाढून रक्तातील सोडियमचे प्रमाण कमी होऊ शकते.

Kidney effects of drinking too much water | pinterest

सोडियमचे प्रमाण कमी

अतिरिक्त पाणी प्यायल्याने रक्तातील सोडियम कमी होऊ शकते. सोडियम हे शरीरातील द्रवांचे संतुलन, स्नायूंचे कार्य आणि मज्जासंस्थेसाठी महत्त्वाचे असते. सोडियमचे प्रमाण खूप कमी झाल्यास डोकेदुखी, मळमळ, उलट्या होणे, अशक्तपणा या समस्या उद्भवतात.

Low in sodium | pinterest

दिवसातून किती पाणी प्यावे?

प्रत्येक व्यक्तीची पाण्याची गरज वेगवेगळी असते. वय, वजन, शारीरिक हालचाल, हवामान, आहार आणि आरोग्याची स्थिती यावर ती अवलंबून असते. परंतु सर्वसाधारण दिवसातून २ ते ३ लिटर पाणी पिणे गरजेचे आहे.

How much water to drink a day? | pinterest

जास्त पाणी पिणे का टाळावे?

किडनीची समस्या असलेल्या व्यक्तींना शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर टाकणे कठीण जाऊ शकते. त्यामुळे शरीरात पाणी साचण्याची शक्यता असते.

Why avoid drinking more water? | pinterest

'या' समस्यांचा करावा लागतो सामना

पाय आणि घोट्यांना सूज येणे, चेहऱ्यावर सूज दिसणे, श्वास घेण्यास त्रास होणे, रक्तदाब वाढणे, शरीराचे वजन अचानक वाढणे

problems | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : सकाळी कोणते ड्रायफ्रूट्स खावे अन् संध्याकाळी कोणते? जाणून घ्या योग्य वेळ अन् फायदे

Dry Fruits | AI PHOTO
येथे क्लिक करा...