Shreya Maskar
ड्रायफ्रूट / सुकामेवामध्ये शरीराला आवश्यक असणारे प्रथिने, हेल्दी फॅट्स, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. रोजच्या आहारात योग्य प्रमाणात सुकामेव्याचा समावेश केल्यास शरीराला ऊर्जा मिळते आणि हृदय, मेंदूचे आरोग्य चांगले राहते.
सकाळी नाश्त्यापूर्वी किंवा नाश्त्यासोबत बदाम खाऊ शकता. रात्री बदाम पाण्यात भिजत ठेवून सकाळी खाणे उत्तम आहे. बदामामध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, फायबर, प्रथिने आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात.
अक्रोडामध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड, प्रथिने, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. सकाळी नाश्त्यासोबत अक्रोड खाऊ शकता. दुपारच्या जेवणानंतर हलका स्नॅक म्हणून खाणेही योग्य आहे. संध्याकाळी भूक लागल्यास अक्रोडाचा समावेश स्नॅकमध्ये करू शकता.
काजूमध्ये मॅग्नेशियम, कॉपर, झिंक, प्रथिने आणि हेल्दी फॅट्स असतात. सकाळी नाश्त्यासोबत काजू खाऊ शकता. दुपारी किंवा संध्याकाळी स्नॅक म्हणून खाणे योग्य. व्यायामापूर्वी काही वेळ आधी खाल्ल्यास ऊर्जा मिळण्यास मदत होऊ शकते.
सकाळी नाश्त्यासोबत पिस्ता खाऊ शकता. भूक लागल्यावर पिस्ता खाणे हा चांगला पर्याय आहे, यातून प्रथिने आणि ऊर्जा मिळते. शक्यतो मीठ न घातलेला पिस्ता निवडावा.
सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मनुके खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. ओट्स, दलिया किंवा दह्यामध्ये मनुके घालून खाऊ शकता. हलका स्नॅक म्हणून मनुके खाणे योग्य आहे.
सुकामेवा मर्यादित प्रमाणात खावा. त्यामध्ये कॅलरी जास्त असतात. शक्यतो मीठ न घातलेला आणि साखरेचा लेप नसलेला सुकामेवा निवडा. कोरडा सुकामेवा देखील पौष्टिक असतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.