Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: या जिल्ह्यातील 84 हजार लाडक्या बहिणी अपात्र, तब्बल 151 कोटींचा घेतला लाभ

Ladki Bahin Yojana 84 Thousand Women Application Rejected: राज्यातील जवळपास २६ लाख लाडक्या बहिणी अपात्र असल्याचे समोर आले आहेत. आता याच महिलांची पडताळणी सुरु झाली आहे.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुरु

साताऱ्यातील ८४ हजार महिलांचे अर्ज बाद

या महिलांना मिळणार नाहीत १५०० रुपये

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची आता पडताळणी सुरु आहे. लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांचे अर्ज बाद केले जात आहे. दरम्यान, आता सातारा जिल्ह्यातील ८४ हजार महिलांचे अर्ज बाद केले आहेत. त्यामुळे या महिलांना आता दर महिन्याला १५०० रुपये मिळणार नाहीत.

साताऱ्यातील ८४ हजार महिलांचे अर्ज बाद (Satara 84 Thousand Women Application Rejected)

विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरु झाली होती. त्यात अनेक महिलांनी निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांच्या अर्जांची आता पडताळणी सुरु झाली आहे. यातून जवळपास २६ लाख महिला अपात्र असल्याचे समोर आले आहे. त्यातील सातारा जिल्ह्यातील ८४ हजार महिलांना आता योजनेचा लाभ मिळणार नाही.

लाडक्या बहिणींचे अर्ज का बाद केले?

सातारा जिल्ह्यातील ८४ हजार १३ महिला अपात्र ठरल्या आहेत. या योजनेतील लाभार्थ्यांच्या कुटुंबाच्या उत्पन्न २.५ लाख असणे गरजेचे आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक सरकारी नोकरदार आणि अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांनी शासनाचा चुकीच्या पद्धतीने वर्षभर तब्बल 151 कोटींचा लाभ घेतल्याचे तपासात उघड झाले. याचसोबत एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनीदेखील योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे त्यांचेही अर्ज बाद केले जाणार आहे. अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांच्या घरी जाऊन चेक करणार आहेत की, महिला खरंच निकषांमध्ये बसतात की नाही. निकषात न बसणाऱ्या महिलांची यादी केली जाणार आहे. त्यातून महिलांना बाद केले जाणार आहेत.

अनुदानाच्या निधीवर पहिला हक्क गरजूंचा आहे. राजकीय लाभासाठी विधानसभेच्या तोंडावर सरसकट महिला योजनेचा लाभ घेतला आहे. मात्र कालांतराने या योजनेचा अडसर विकास कामे आणि इतर निधीवर झाल्याने सरकारने आता अपात्र महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु केली आहे. आता अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Elections Voting Live updates : पुण्यातील प्रभाग 24 मध्ये EVM मशीन बंद

Nashik : मतदानाआधी शिंदेंच्या उमेदवारवर गुन्हा दाखल, अपहरण करतानाचा CCTV व्हायरल

Hot Yoga: झटक्यात वजन कमी करण्यासाठी करा हॉट योगा, एका आठवड्यात वितळेल शरीराची चरबी

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा, या महिलांना ₹१५०० मिळालेच नाहीत; कारण काय?

Mahapalika Election : ...तुम्हा सगळ्यांना कळकळीची विनंती, प्राजक्ता माळीनं केलं आवाहन | Video

SCROLL FOR NEXT