Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना धक्का! या जिल्ह्यातील ६१ हजार महिलांचा लाभ बंद; तुमचं तर नाव नाही ना?

Ladki Bahin Yojana 61 Thousand Women Wont Get Benefit: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लातूरमधील ६१ हजार महिलांचा लाभ बंद झाला आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेतून अनेक लाभार्थ्यांचा लाभ बंद

केवायसीतील चुकीमुळे लाभ बंद

लातूरमधील ६१ हजार महिलांचा दोन महिन्याला हप्ता रखडला

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना खूप चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले होते. लाडकी बहीण योजनेत केवायसी न केल्याने अनेक महिलांचे लाभ बंद झाले आहेत. दरम्यान, केवायसी करुनदेखील अनेक महिलांचा लाभ बंद झाला आहे. केवायसीमध्ये चुकी झाल्यावरदेखील अनेक महिलांचे लाभ बंद झाले आहेत. लातूरमधील जवळपास ६१ हजार महिलांना पैसे मिळालेले नाहीत.

लातूरमधील महिला लाभापासून वंचित

लातूरमध्ये साधारण 61 हजार लाडक्या बहि‍णींचा लाभ बंद झाला आहे. ई-केवायसीतील चुकीचा फटका बसला आहे. मागच्या दोन महिन्यापासून या लाडक्या बहिणीचं मानधन थकलं आहे. त्यांना ३००० रुपये मिळालेले नाही.

या लाडक्या बहिणींचे आर्थिक नियोजन कोलमोडत असल्याने या बहिणींपुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. अनेक महिलांनी ईकेवायसी करताना शासकीय नोकरी, एकच कुटुंबात इतर महिलांना लाभ घेत असल्याचा पर्याय निवडला आहे. याचसोबत आधारला मोबाईल नंबर लिंक नसणे या कारणांमुळे मानधन थकल्याचं सांगितलं जात आहे.

दुसरीकडे या लाडक्या बहिणींना दिलासाही देण्यात आला आहे. आज पासून जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांच्या मदतीने प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. यानंतर पुन्हा लाभाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सध्या जिल्ह्यात एकूण 5 लाख 67 हजार 459 महिला लाभार्थ्यांची संख्या आहे. यातील ६१ हजार महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Serial: 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत नवा ट्विस्ट; 'मन धावतंया'फेम राधिका भिडेची होणार एन्ट्री

Mumbai Metro Line 8 : मुंबई - नवी मुंबई एअरपोर्ट मेट्रो-८ द्वारे जोडणार, गोल्डन लाईनवर कोणती २० स्थानके असणार? नावं आली समोर

Pista Kulfi Recipe: घरच्या घरी झटपट बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी पिस्ता कुल्फी रेसिपी

WhatsApp Update: WhatsApp हॅक होण्याचा धोका संपला! 'हे' नवीन फिचर आत्ताच करा ऑन, वाचा संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update: छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT