Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकींसाठी ४१० कोटी मंजूर; ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार? eKYC बाबत घेतला मोठा निर्णय

Ladki Bahin Yojana October Installment Update: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार याबाबत अपडेट समोर आली आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार?

लाडकी बहीण योजनेच्या ईकेवायसीबाबत मोठी अपडेट

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सप्टेंबरचा हप्ता मिळाला आहे. त्यानंतर आता लाभार्थी महिला ऑक्टोबरच्या हप्त्याची वाट पाहत आहे. ऑक्टोबरचे पैसे महिलांना कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, लवकर ऑक्टोबरचे पैसेदेखील जमा केले जातील, असं सांगण्यात येत आहे.

सप्टेंबरच्या हप्त्यासाठी ४१० कोटी मंजूर

लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून ४१० कोटींचा निधी मंजूर झाला. शुक्रवारपासून हे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. दरम्यान, त्यानंतर आता महिला ऑक्टोबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार? (Ladki Bahin Yojana When Will October Installment Come)

लाडकी बहीण योजनेत ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. ऑक्टोबरचा हप्ता कदाचित महिनाअखेपर्यंत येऊ शकतो. सणासुदीच्या काळात कदाचित महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. दरम्यान, याबाबत लवकरच आदिती तटकरे अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

ई केवायसीबाबत मोठा निर्णय (Ladki Bahin Yojana eKYC Process)

लाडकी बहीण योजनेत महिलांना ई केवायसी करणे अनिवार्य केले आहे. दरम्यान, आता ई केवायसीबाबत आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांना आता ई केवायसी करण्यासाठी १५ दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली आहे. पूरग्रस्त भागातील महिलांसाठी ही मुदत वाढवण्यात आली आहे. इतर महिलांना नोव्हेंबरपर्यंत ई केवायसी करता येणार आहे. आतापर्यंत १ कोटींपेक्षा जास्त महिलांनी ई केवायसी केली आहे. दररोज ४-५ लाख महिलांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण होत असल्याची माहिती स्वतः मंत्री आदिती तटकरेंनी केली आहे. आता ई केवायसी प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींवरदेखील तोडगा काढला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahesh Manjrekar: आज शिवाजी महाराज असते तर...; महेश मांजरेकरांसह 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाचे कलाकार साई चरणी नतमस्तक

Surya Gochar Luck: सूर्य तूळ राशीत करणार मार्गक्रमण, मिथुन, सिंहसह आणखी एक रास होणार मालामाल

Jalgaon : धरणात पोहण्यासाठी उतरणे जीवावर बेतले; तरुणाचा बुडून मृत्यू

Silver Rate Prediction: सोन्यापेक्षा चांदीनं केलं मालामाल! १० महिन्यात ₹९०,००० वाढ, आता खरेदी करणे योग्य का?

OBC Reservation: बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा! गेवराईतून 500 गाड्यांचा ताफा रवाना|VIDEO

SCROLL FOR NEXT