Sakshi Sunil Jadhav
उन्हाळ्यात उष्णता, घाम आणि धूळ यामुळे त्वचेवर तेलकटपणा वाढतो. त्यामुळे अनेकांना पिंपल्स, टॅनिंग आणि त्वचा निस्तेज होण्याची समस्या जाणवते. अशा वेळी साबणाऐवजी घरगुती उपाय म्हणून बेसन पॅक वापरणे फायदेशीर ठरू शकते.
उन्हामुळे होणारी टॅनिंग कमी करण्यासाठी बेसन पॅक फायदेशीर मानला जातो. नियमित वापर केल्याने त्वचा उजळ दिसू शकते.
उन्हाळ्यात अनेकांची त्वचा खूप तेलकट होते. बेसन पॅक लावल्याने त्वचेतील अतिरिक्त तेल कमी होण्यास मदत होते.
बेसन पॅक हलक्या स्क्रबसारखे काम करते. त्यामुळे मृत त्वचा दूर होऊन चेहरा अधिक चमकदार दिसतो.
एका बाउलमध्ये 2 चमचे बेसन घ्या. त्यात 1 चमचा दही किंवा गुलाबपाणी घाला. चिमूटभर हळदही घालू शकता आणि चांगले मिक्स करा.
तयार केलेला पॅक चेहऱ्यावर आणि मानेवर समान पसरवा. 10 ते 15 मिनिटे सुकू द्या.
पॅक सुकल्यानंतर हलक्या हाताने पाण्याने चेहरा धुवा. चेहरा पुसून हलका मॉइश्चरायझर लावा.
उन्हाळ्यात हा बेसन पॅक आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरल्यास त्वचा स्वच्छ, ताजीतवानी आणि चमकदार दिसण्यास मदत होते.
त्वचा संवेदनशील असल्यास कोणताही घरगुती उपाय वापरण्यापूर्वी त्वचेवर छोटासा पॅच टेस्ट करून पाहणे योग्य ठरते.