Maharashtra Octobar Heat : राज्याला 'ऑक्टोबर हिट'ची झळ, उकाड्याने नागरिक हैराण, काय आहे हवामान विभागाचा अंदाज ?

Maharashtra News : राज्यात परतीच्या पावसाने उसंत घेतली असून, कमाल तापमान वाढल्याने ‘ऑक्टोबर हीट’चा त्रास वाढला आहे. पुढील दोन दिवस राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने दर्शवले आहे.
Maharashtra Octobar Heat : राज्याला 'ऑक्टोबर हिट'ची झळ, उकाड्याने नागरिक हैराण, काय आहे हवामान विभागाचा अंदाज ?
Maharashtra NewsSaam Tv
Published On
Summary
  • परतीच्या पावसाने उसंत घेतली असून राज्यात उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत

  • सोलापूर आणि मुंबईत कमाल तापमान ३४ अंशांपेक्षा अधिक नोंदवण्यात आले

  • अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा ओसरला आहे

  • पुढील दोन दिवस ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे

राज्यात परतीच्या पावसाने उसंत घेतली असून नागरिकांना उन्हाच्या झळांना सामोरं जावं लागत आहे. कमाल तापमानात वाढ झाल्याने राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा ताप कायम आहे. पावसाला पोषक वातावरण असून आज नागरिकांना उन्हाचा चटका सोसावा लागणार आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा ओसरला असून, या भागात समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. काल सकाळपर्यंत राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह उकाडा कायम होता. बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३२ अंश होता तर, दुपारच्या वेळी उन्हाचा प्रकाश तीव्र होता.

Maharashtra Octobar Heat : राज्याला 'ऑक्टोबर हिट'ची झळ, उकाड्याने नागरिक हैराण, काय आहे हवामान विभागाचा अंदाज ?
Maharashtra Transport : ओला-उबरसारख्या अ‍ॅप कंपन्यांच्या भाडेवाढीला लगाम, वाचा राज्य सरकारचा नेमका प्लॅन काय?

काल म्हणजेच रविवारी पहाटे पर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर जिल्ह्यात उच्चांकी ३४.५ अंश तापमानाची नोंद झाली. सोलापूरसह मुंबईतील सांताक्रुझ येथे ३४ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून, आज मुख्यतः उघडिपीसह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Maharashtra Octobar Heat : राज्याला 'ऑक्टोबर हिट'ची झळ, उकाड्याने नागरिक हैराण, काय आहे हवामान विभागाचा अंदाज ?
Ahilyanagar Attack : जामखेडच्या कला केंद्रात राडा, नर्तकीच्या तक्रारीनंतर २० जणांचा धिंगाणा, तोडफोड

मॉन्सूनने शुक्रवारी १० ऑकटोबर रोजी संपूर्ण गुजरातसह महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागातून काढता पाय घेतला आहे. अलिबाग, अहिल्यानगर, अकोला, जबलपूर, वाराणसी, रक्सौलपर्यंत मॉन्सूनच्या परतीची सिमा रविवारी कायम होती. पुढील दोन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागातून मॉन्सून परतण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com