Ladki Bahin Yojana Saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: मकरसंक्रांतीला लाडकीच्या खात्यात ₹३००० जमा होणार; पण 'या' महिलांना मिळणार नाहीत पैसे; वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana These Women will not get 3000 Rupees: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मकरसंक्रांतीला महिलांच्या खात्यात दोन हप्ते दिले जाणार आहे. दरम्यान, आता काही महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट

मकरसंक्रांतीला मिळणार ३००० रुपये

या महिलांचा लाभ कायमचा बंद होणार

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जानेवारी महिना हा डबल आनंदाचा ठरणार आहे. या महिलांना लाडकीच्या खात्यात दोन हप्ते जमा होणार आहेत. लाडक्या बहि‍णींना डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे लवकरच दिले जाणार आहे. मकरसंक्रांतीला महिलांचे तोंड गोड होणार आहे. महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा केले जाणार आहे. दरम्यान, एककडे महिलांना ३००० रुपये मिळणार असल्याने आनंदाचे वातावरण आहे तर दुसरीकडे काही महिलांना हा हप्ता मिळणार नाहीये.

या लाडक्या बहि‍णींना मिळणार नाही ३००० रुपये (These Women Will not get 3000 Rupees)

लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे एकत्र येणार आहे. मात्र, अनेक महिलांना हा लाभ मिळणार नाहीये. लाडकी बहीण योजनेत केवायसी करणे अनिवार्य आहे. केवायसी न केल्यास योजनेचा लाभ बंद केला जाणार आहे. त्यामुळे ज्या महिलांनी केवायसी केले नाही त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ होती. दरम्यान, मुदतीपूर्वी लाखो महिलांनी केवायसी पूर्ण केले नाही. जवळपास ३० लाख महिलांनी केवायसी न केलेले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

निकषात न बसणाऱ्या महिलांचा लाभ बंद

लाडकी बहीण योजनेत ज्या महिला निकषात बसत नाही त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे. ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे त्या महिलांची माहिती उघडकीस येणार आहे. महिलांसोबतच त्यांच्या पती किंवा वडिलांची केवायसी करणे अनिवार्य होते. त्यामुळे जर तुमचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तर ही माहिती उघडकीस येणार आहे आणि तुमचा लाभ बंद होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: 9 वर्षांनंतर अचानक समोर आला बॉयफ्रेंड आणि....! लॉन्ग डिस्टन्स कपलचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Tilgul Ladoo: तिळगुळ लाडू मऊ होण्यासाठी वापरा 'या' ३ सोप्या ट्रिक्स; ही आहे सोपी रेसिपी

Pune : प्रशांत जगतापांचे गुंड टिपू पठाणशी "घनिष्ट" संबंध? जामिनावर बाहेर आलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून आरोप

Maharashtra Live News Update : पुण्यात अजित पवारांचा भव्य रोड शो

PF Withdrawal: कामाची बातमी! या UPI App मधून काढता येणार PF चे पैसे, वाचा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT