Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यात ₹३००० ऐवजी ₹१५०० आले, आता डिसेंबरचा हप्ता का रखडला? महत्त्वाची माहिती समोर

Ladki Bahin Yojana December Installment: लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरपर्यंतचे सर्व हप्ते देण्यात आले आहेत. त्यानंतर आता डिसेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On
Summary

लाडकीच्या खात्यात नोव्हेंबरचा हप्ता जमा

डिसेंबरचे पैसे कधी येणार?

या तारखेपर्यंत महिलांना मिळू शकतात पैसे

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला आहे. महिला डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. दरम्याम, मध्यंतरी नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा होती. परंतु महिलांना फक्त एकच हप्ता जमा झाला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना १८वा म्हणजेच डिसेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: KYC केली तरीही 'या' लाडक्या बहिणींना मिळणार नाही ₹१५००; कारण काय? वाचा

निवडणुकांमुळे पैसे येणार नाहीत?

राज्यात सध्या महापालिका निवडणूकांचे वारे वाहत आहेत. महापालिका निवडणूका १५-१६ डिसेंबर रोजी होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता महिलांना डिसेंबरचा हप्ता दिला जाण्याची शक्यता आहे. हा हप्ता का पुढे ढकलण्यात आला याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, मागच्या अनेक महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचे हप्ता पुढे ढकलण्यात आले आहेत.

कधी येणार खात्यात पैसे?

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,नोव्हेंबरचा हप्ता देण्यात आला आहे. परंतु डिसेंबरच्या हप्त्यासाठी अर्थ मंत्रालयाकडून मंजुरी मिळालेली नाही. आचार संहिता लागू असल्याने १५ जानेवारीपूर्वी या हप्त्यासाठी निधी देणे कठीण दिसत आहे. त्यामुळे महापालिका निवडणुका होईपर्यंत लाडक्या बहि‍णींना वाट पाहावी लागणार आहे.

आचारसंहितेमुळे पैसे अडकणार?

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजना आणि आचारसंहितेचा फार काही संबंध येत नाही. या योजनेत पैसे देऊ शकतात. दरम्यान तरीही अजून पैसे जमा झालेले नाही. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या आहेत.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर-जानेवारीचे ₹३००० एकत्र येणार, तारीख आली समोर, वाचा लेटेस्ट अपडेट

जानेवारीत ३००० येण्याची शक्यता

लाडकी बहीण योजनेत जानेवारी महिन्यात महिलांना पैसे दिले जाऊ शकतात. डिसेंबर- जानेवारीचा हप्ता एक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर हप्ता एकत्र दिला तर जानेवारीत महिलांना डबल गिफ्ट मिळेल. महिलांना ३००० रुपये दिले जाऊ शकतात.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी धुळ्यातून केली मोठी घोषणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com